Pimpri Chinchwad Regional Transport Office : नवीन वाहन नोंदणी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या करवसुलीची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या शुक्रवार 29 मार्च ते रविवार 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील महसूली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्चअखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
त्याअनुषंगाने गुड फ्रायडे 29 मार्च, शनिवार 30 मार्च व रविवार 31 मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगीक करवसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक कामकाज जसे थकीत कर वसुली व खटला विभागाचे (महसूल जमा होणारे कामकाज) कामकाज कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे. ( Pimpri Chinchwad Regional Transport Office will continue to operate even on holidays till March End )
जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे 39 लाख रुपये महसूल जमा –
पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या 11 वाहनांचा 6 मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला असून त्यामध्ये 38 लाख 90 हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. कर न भरलेली व गुन्ह्यात अटकावून ठेवलेली 13 वाहने ई- लिलावासाठी उपलब्ध होती. यात बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या मालकांनी वेळोवेळी संधी देऊनही थकीत कर भरणा केला नसल्याने या वाहनांचा www.eauction.gov.in या शासकीय संकेतस्थळावर ई- लिलाव ठेवण्यात आला. त्यापैकी 11 वाहनांना ऑनलाईन बोली प्राप्त झाली व त्यानुसार महसूल प्राप्त झाला आहे.
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी 37 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, आमदार सुनिल शेळकेंचाही समावेश, वाचा यादी
– अत्यंत धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’, वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मुलींचा प्रताप? । Lonavala Crime News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून एप्रिल महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे