लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करणे, प्रचारकांची यादी जाहीर करणे याची घाई सुरु केली आहे. उमेदवारांच्या याद्या जशा समोर येत आहेत, तशाच सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या याद्या देखील समोर येत आहेत. बुधवारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या वतीनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
राष्ट्रवादीच्या या यादीत एकूण 37 स्टार प्रचारक असून पक्षाध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. ( NCP announced list of 37 star campaigners for Lok Sabha Election 2024 )
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे ;
1. अजित पवार
2. प्रफुल पटेल
3. सुनिल तटकरे
4. छगन भुजबळ
5. दिलीप वळसे पाटील
6. रामराजे नाईक निंबाळकर
7. धनंजय मुंडे
8. हसन मुश्रीफ
9. धर्मरावबाबा आत्राम
10. अनिल पाटील
11. नरहरी झिरवाळ
12. संजय बनसोडे
13. अदिती तटकरे
14. सुबोध मोहिते
15. ब्रिजमोहन श्रीवास्तव
16. के. के. शर्मा
17. सय्यद जलालूद्दीन
18. बाबा सिद्दीकी
19. रुपाली चाकणकर
20. अमोल मिटकरी
21. सुनिल टिंगरे
22. इंद्रनील नाईक
23. सुनिल शेळके
24. विक्रम काळे
25. चेतन तुपे
26. नितीन पवार
27. डॉ. राजेंद्र शिंगणे
28. दत्ता भारणे
29. सतीश चव्हाण
30. उमेश पाटील
31. समीर भुजबळ
32. अमरसिंह पंडित
33. नजीब मुल्ला
34. सुरज चव्हाण
35. कल्याण आखाडे
36. सुनिल मगरे
37. इद्रीस नायकवडी
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर आमचा अधिकार, भारतीय जनता पार्टीने मला संधी द्यावी! पाहा कोणी केलीये मागणी । Maval Lok Sabha Election
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा सविस्तर । Pune News
– लोकसभा निवडणूकीत मतदान करताना ‘ही’ 12 ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार, पाहा यादी । Lok Sabha Election 2024