व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर आमचा अधिकार, भारतीय जनता पार्टीने मला संधी द्यावी! पाहा कोणी केलीये मागणी । Maval Lok Sabha Election

मावळ लोकसभा मतदार संघामध्ये कामगार मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा राष्ट्रीय श्रमिक आघाडीला मिळावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 28, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Devendra-Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Election : मावळ लोकसभा मतदार संघामध्ये कामगार मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा राष्ट्रीय श्रमिक आघाडीला मिळावी, अशी मागणी यशवंत भोसले यांनी केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीने महायुतीचा उमेदवार म्हणून जर उमेदवारी दिली तर श्रमिकांचा नेता म्हणून मोठ्या मताधिक्याने मी विजयी होईल असेही यशवंत भोसले यांनी म्हटले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महायुतीत मावळ लोकसभेची जागा शिवसेना पक्षाला की भाजपाला जाणार, याचा पेच कायम आहे. असे असताना भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कामगार नेते तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी पक्षाकडे केल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. ( Nominate me for Maval Lok Sabha National Shramik Aghadi Yashwant Bhosale demand to BJP )

कासारवाडी येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यशवंत भोसले यांनी ही मागणी केली. यावेळी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कोलकोटे, एसकेएफचे स्वानंद पाचपाठक, हॉटेल व्यावसायीकांचे प्रतिनिधी दिपक पाटील, विद्यार्थी व युवा संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, विठ्ठल ओझरकर, नितीन कांबळे, बापुसाहेब वाघेरे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मावळ लोकसभा क्षेत्रातील बऱ्यापैकी भाग हा औद्योगिक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग वास्तव्यास आहे. या श्रमिक वर्गाच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व लोकसभेत करण्यासाठी महायुतीत भाजपने मावळ लोकसभा क्षेत्राची जागा ज्येष्ठ कामगार नेता म्हणून मला द्यावी, अशी अपेक्षा यशवंत भोसले यांनी पक्षाकडे केल्याचे नमूद केले. दरम्यान पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नाही तर बंड करून वेगळी भूमिका घेणार नाही, असेही भोसलेंनी स्पष्ट केले.

अधिक वाचा –
– जनहित चॅरिटेबल ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर; यंदा 1 मे रोजी तळेगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
– वराळे येथील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता शकुंतला मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन । Maval News
– श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पवनानगर येथून मानाची दिंडी आणि पालखी देहूगावच्या दिशेने मार्गस्थ । Tukaram Beej 2024


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा सविस्तर । Pune News

Next Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून एप्रिल महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून एप्रिल महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.