व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील आर्या अहिरे प्रथम । Talegaon Dabhade

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व दिवंगत अ‍ॅड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट आणि समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Samarth-Shalaka-exam

Photo Courtesy : Team Dainik Maval


नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व दिवंगत अ‍ॅड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट आणि समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढावी व भविष्यातील स्पर्धा परीक्षांचे आकलन व्हावे म्हणून समर्थ शलाका स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सभागृहात नुकतेच पार पडले. या परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील नववीच्या वर्गातील आर्या अहिरे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पुरस्कार वितरणावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी मिनीनाथ खुरसूले, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्था संचालक दामोदर शिंदे, महेश शहा, विनायक अभ्यंकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ( Arya Ahire Student of Shree Ekvira Vidya Mandir Karla School stood first in Samarth Shalaka competitive examination )

स्पर्धेत सन 2023-24 यावर्षी इयत्ता चौथी मध्ये 171 विद्यार्थी, इयत्ता सातवी 397 विद्यार्थी,इयत्ता नववी मध्ये 663 विद्यार्थी व इयत्ता अकरावी मध्ये 219 विद्यार्थी असे एकूण 1350 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. परीक्षेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थी तसेच प्रत्येक शाळेतील प्रथम विद्यार्थी (प्रोत्साहनपर विद्यार्थी) या प्रकारे निवड करण्यात आली.

यावेळी संतोष खांडगे यांनी प्रास्ताविकांमधून स्पर्धा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. गणेश खांडगे यांनी भविष्यात पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. संस्थाध्यक्ष संजय भेगडे यांनी दिवंगत अ‍ॅड शलाका खांडगे हिस आदरांजली वाहून स्पर्धा परीक्षांच्या उपयुक्तते बद्दल मार्गदर्शन केले. सुदाम वाळुंज यांनी उपक्रमाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रभा काळे यांनी सूत्रसंचालन केले. महेश शहा यांनी आभार मानले.

अधिक वाचा –
– निलेश लंकेंचा अजितदादांना ‘रामराम’, आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची ‘तुतारी’ फुंकली । mla nilesh lanke resigned ncp
– रेल्वेच्या गर्दीमुळे पोलिसाचा मृत्यू, कर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले
– मावळ लोकसभेसाठी मराठा समाजाकडून ‘या’ नावाची होतेय चर्चा । Maval Lok Sabha Election 2024


dainik maval jahirat

Previous Post

‘तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय’, उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश

Next Post

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barane-Maval-loksabha

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.