तळेगाव दाभाडे नगर परिषदेची थकीत करवुसलीसाठी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 30) अखेर 21 कोटी 87 लाख रुपये वसुल झाले आहेत. तर 21 मिळकतींवर जप्तीची कारवाई केली आहे. मात्र, जोरदार कारवाई सुरु असतानाच काही थकबाकीदार त्याला दाद देत नसल्याने त्यांची नावे चौका-चौकांतील फलकांवर लावण्याचा इशारा परिषदेने दिला आहे. जोपर्यंत थकीत भरणा होत नाही; तोपर्यंत ही नावे तशीच ठेवण्यात येणार असल्याचेही परिषदेने म्हटले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तळेगाव दाभाडे शहरात 37 हजार 756 मालमत्तांची नोंदणी नगर परिषदेकडे झालेली आहे. परिषदेला मालमत्ता करापोटी 32 कोटी 95 लाख 60 हजार रूपयांची वसुली करावयाची आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कोटी 22 लाख रुपये करापोटी तर पाणीपट्टी कराची 9 कोटी 4 लाख रुपये इतक्या मागणीपैकी 4 कोटी 65 लाख असे एकूण 21 कोटी 87 लाख रूपये वसूल झाले आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक विजय शहाणे, मिळकतकर व्यवस्थापक जयंत मदगे यांच्यासह बारा विभागांतील अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. ( talegaon dabhade municipal council administration is aggressive for recovery of tax arrears )
21 मिळकती जप्त –
अनेकवेळा आवाहन करुन आणि नोटिसा पाठविल्या. परंतु, काहींनी कराची रक्कम भरली नाही, अशा 21 मिळकतदारांच्या मिळकतींना सील लावून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर 7 जणांचे नळजोड खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कराची रक्कम त्वरित भरावी, असे आवाहन परिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– अखेर ठरलं! बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय लढत, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी । Supriya Sule Vs Sunetra Pawar
– शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी
– लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात