तुम्ही जर बुधवार आणि गुरुवार रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कि.मी. ९३/९०० येथे ३ व ४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ ते २ या दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असून गॅन्ट्री बसविताना मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिज वरून जुना मुंबई – पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका कि.मी ५५.००० वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुणेच्या दिशेने मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. ( mega block on yashwantrao chavan mumbai pune expressway News )
अधिक वाचा –
– वडगाव येथील पक्ष कार्यालयात मावळ भाजपाची मासिक बैठक संपन्न । Vadgaon Maval
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त
– नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट । LPG Gas Cylinder Price