व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट मिळालेच, ‘या’ पक्षाकडून मोरेंना पुणे लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Vasant-More

Photo Courtesy : Team Dainik Maval


वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आज (दि. 2 एप्रिल) रोजी लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यात पुणे लोकसभेतील उमेदवाराचे देखील नाव जाहीर करण्यात आले. पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितने मनसे पक्षाला नुकतीच सोडचिट्टी दिलेल्या वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यापासून वसंत मोरे लोकसभेच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होते. अखेर वसंत मोरे यांना वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

पुण्यात रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसची अर्थात महाविकासआघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून वंसत मोरे हे वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभा लढवणार का, याची चर्चा रंगली होती. या चर्चेवर रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला तरी त्यांचं स्वागत असेल, असे धंगेकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर अखेर आज वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्याची अधिकृत उमेदवारी मिळालीये.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. pic.twitter.com/a1Gx2b9nKg

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024

माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय ‘वंचित बहुजनांसाठी’ मी मैदानात येतोय..!

बदल घडणार…वसंत फुलणार…!#पुणे_की_पसंत_मोरे_वसंत pic.twitter.com/mhd0XmAvE1

— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 2, 2024

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha
– वडगाव येथील पक्ष कार्यालयात मावळ भाजपाची मासिक बैठक संपन्न । Vadgaon Maval
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पुढील दोन दिवसात मुंबई-पुणे प्रवास करणार असाल, तर ‘ही’ बातमी नक्की वाचा । Mumbai Pune Expressway News

Next Post

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vikas-Mahatme-Pune

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.