व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोसायटी मेंटेनन्स न भरल्यास जप्ती कायदेशीरच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

सोसायटी मेंटेनन्स न भरणाऱ्या रहिवाशांवर जप्तीची कारवाई करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Court

File Image


सोसायटी मेंटेनन्स न भरणाऱ्या रहिवाशांवर जप्तीची कारवाई करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ही कारवाई करण्यासाठी परवानगी न देणाऱ्या उपनिबंधकांचे आदेश न्यायालयाने रद्द केले आहेत. रहिवाशांच्या थकीत मेंटेनन्सचा परिणाम सोसायटीवर होतो. वसुलीचा अधिकार कायद्याने सोसायटीला देण्यात आला आहे. हा अधिकार सोसायटीकडून हिरावून घेणे अयोग्य आहे. ही बेकायदेशीर कृती खपवून घेतली जाऊ शकत नाही, असे न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

प्रकरण काय?
लिगसी गृहनिर्माण सोसायटीने ही याचिका केली होती. अवघ्या 12 सदस्यांची ही सोसायटी आहे. त्यातील एक सदस्य वर्षानुवर्षे मेंटेनन्स भरत नव्हता. त्याची थकबाकी सुमारे 30 लाख रुपयांची आहे. थकबाकी वसुलीसाठी सोसायटीने उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला. वसुलीसाठी मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती सोसायटीने केली. त्यास उपनिबंधक यांनी नकार दिला. सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उपनिबंधकांला चपराक देत न्यायालयाने सोसायटीला दिलासा दिला.

कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्याने गृहनिर्माण सोसायटीला थकीत मेंटेनन्सच्या वसुलीचा अधिकार दिला आहे. उपनिबंधकांच्या परवानगीने वसुलीसाठी सोसायटी घरावर जप्ती आणू शकते, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

कोर्टाचा नवा आदेश –
रहिवाशांच्या थकीत मेंटेनन्सची वसुली करण्यासाठी सोसायटीने अर्ज केल्यास उपनिबंधकाने त्याची शहानिशा करायला हवी. त्यानंतरच वसुलीसाठी सोसायटीला प्रमाणपत्र द्यायला हवे, असे कायदा सांगतो. तरीही उपनिबंधक यांनी लिगसी गृहनिर्माण सोसायटीचा अर्ज फेटाळून लावला. उपनिबंधकांचा हा निर्णय रद्द केला जात आहे. सोसायटीच्या अर्जावर उपनिबंधकांनी नव्याने निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले. ( If society maintenance is not paid seizure of flat is legal said High Court )

अधिक वाचा –
– उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मशाल गावागावात पोहोचण्यास सुरुवात; संजोग वाघेरे-पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद
– पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे
– महत्वाची बातमी! निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध । Lok Sabha 2024


Previous Post

‘उड्डाणपूल हवा पण…’ वडगावमधील केशवनगर रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne

राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल - अजित गव्हाणे यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.