व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मी कुणाला कुठेही पाठवलं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राहू नका, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका’

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या अर्थात श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक आज (दि. 8 एप्रिल) पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 8, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Ajit-Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या अर्थात श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक आज (दि. 8 एप्रिल) पार पडली. या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सध्यातरी श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे. यात महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मावळ लोकसभेत आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना उद्देशून भाषण केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे हे एकेकाळी अजित पवार यांचे निकटवर्तीय होते. अजितदादा यांचे ते खंदे समर्थक मानले जात होते. परंतू लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आता ते श्रीरंग बारणे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. परंतू मतदारसंघात दबक्या आवाजात अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत. संजोग वाघेरे हे देखील काही बाबतीत धक्कादायक खुलासा करत आहेत, त्याबद्दल अजित पवार यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला.
हेही वाचा – र…राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha

अजित पवार यांनी सभेत बोलताना संजोग वाघेरे यांच्यावर निशाणा तर साधलाच. सोबतच, विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे, पण तसं नाही, असेही अजित पवार म्हणाले. “विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गप्पा मारायला देखील जाऊ नका – अजित पवार
“कोणत्याही परिस्थितीत मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. आपला विरोधी उमेदवार संजोग वाघेरे यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध आहेत. परंतू, निवडणुकीची प्रचार यंत्रणा सुरू झाल्यावर काही गोष्टी पाळाव्या लागतात. 13 तारखेचे मतदान होईपर्यंत विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, गप्पा-टप्पा मारायला जाऊ नका, निवडणूक काळापर्यंत नातेसंबंध बाजूला ठेवावे. वाघेरे सांगत आहेत की, मीच त्यांना तिकडे पाठवले, लढायला लावले. हे सगळे खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे आवाहन अजित पवार यांनी केले. ( Maval Lok Sabha Shiv Sena candidate Shrirang Barane vs Sanjog Waghere Ajit Pawar speech in Mahayuti Sabha )

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सव 2024 निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
– ‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी श्रीरंग बारणे यांचा विजय महत्वाचा’ – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
– मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

र…राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha 2024

Next Post

पैशाच्या वादातून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, वडगाव मावळ न्यायालयाने ठोठावली शिक्षा । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

पैशाच्या वादातून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, वडगाव मावळ न्यायालयाने ठोठावली शिक्षा । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.