Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे जावयाचा खून केल्याप्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पैशाच्या वादातून जावयाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालयाने आरोपी सासऱ्याला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी ही शिक्षा सुनावली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तू बाळू मोहिते आणि त्यांचा जावई मयत सुनील जाधव यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे चिडलेल्या आरोपी मोहिते याने जाधव यांच्या डोक्यावर घरातील धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्मिता चौगुले यांनी सरकारतर्फे हा खटला चालविला हेता. त्यांनी न्यायालयात योग्य पुरावे सादर करून खटला सिद्ध करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करत सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली. ( vadgaon maval court sentenced accused father-in-law to life imprisonment for murdering his son-in-law )
सहायक पोलिस आयुक्त (देहूरोड) देविदास घेवारे, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे याच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट अंमलदार पोलिस कॉन्स्टेबल अविनाश गोरे यांनी या खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालयामध्ये पाठपुरावा केला होता.
अधिक वाचा –
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत बदल, रविवारपासून ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’
– तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सव 2024 निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
– ‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी श्रीरंग बारणे यांचा विजय महत्वाचा’ – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे