व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा उमेदवार मावळात असणार नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर घड्याळ चिन्ह दिसणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दुसराच झेंडा खांद्यावर घ्यावा लागणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval-LokSabha-NCP-Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


सध्या देशभर लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकासआघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. प्रचाराचा धुरळा उडाला असून मतदारसंघात उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचारात गुंतल्याचे चित्र दिसतंय. अशात महाराष्ट्रातील काही मतदारसंघांच्या लढती मात्र राज्यभर गाजताना दिसतायेत किंवा त्यांच्या चर्चा राज्यभर होताना दिसत आहेत. यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. 2009 च्या स्थापनेपासून मावळ लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. परंतू शिवसेनेचा हा भगवा नेहमीच घड्याळाला मात देऊन फडकलेला आहे. मात्र यंदा प्रथमच मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत घड्याळ दिसणार. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून येथील निवडणूक लढवत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यंदा ही निवडणूक लढवणार नाही. याचे कारण म्हणजे राज्यातील राजकीय परिस्थिती. शिवसेना पक्षात पडलेली उभी फुट आणि झालेले दोन गट. हे दोन्ही गट आता परस्परविरोधी आघाडीत आहेत. एक गट जो की शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांचा आहे, तो महायुतीत सत्ताधारी आहे. तर दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून जो उद्धव ठाकरे यांचा असून महाविकासआघाडीत समाविष्ठ आहे. अशात लोकसभा जागा वाटपात ही जागा शिवसेनेची म्हणून दोन्ही आघाड्यात शिवसेनेच्या गटाला ही जागा सुटली. आणि आपसूकच राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली. ही माघार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर तयार झालेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना घ्यावी लागलीये. त्यामुळे यंदा मावळ लोकसभेत घड्याळ चिन्ह मतदान यंत्रावर दिसणार नाही, अशीच परिस्थिती आहे. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 first time there will be no candidate of NCP party )

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या पिंपरी-चिंचवडचा समावेश मावळ लोकसभेत होतो. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मावळ मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडे राहिला. आणि त्यामुळेच मतदारसंघाच्या निर्मितीपासून राष्ट्रवादी काँग्रेस येथे निवडणूक लढवत आली आहे. पहिल्यांदा पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे, दुसऱ्यावेळी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर गेल्या वेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ही निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढली. तिन्ही वेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अपयशाला सामोरे जावे लागले.

यंदा सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी नक्कीच आग्रही होती. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मावळमध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगड जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लोक प्रतिनिधींनी घेतली होती. परंतू, महायुतीत ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कायम राहिली आणि इकडे आघाडीतही ही जागा उद्धव ठाकरेंकडे राहिल्याने, यंदा प्रथमच मतदारसंघात ताकद असूनही राष्ट्रवादीला निवडणूकीतून माघार घ्यावी लागलीये. त्यामुळे मावळ लोकसभेच्या निवडणूकीतून घड्याळ हद्दपार झाल्याचे मतदारांना दिसत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा उमेदवार मावळात असणार नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर घड्याळ चिन्ह दिसणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दुसराच झेंडा खांद्यावर घ्यावा लागणार आहे.

अधिक वाचा-
– मावळमधील कामशेत शहरात ‘पाणीबाणी’ । Kamshet News
– मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख – विशेष लेख
– दुर्दैवी! सांगवडे येथे पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू । Maval Crime


Previous Post

वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी ‘यांना’ संधी । Vadgaon Maval

Next Post

शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेला 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रदान । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rotary-Club-pune

शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेला 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रदान । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.