व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! ‘वंचित’कडून मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी, ‘ह्या’ नावांचा प्राधान्याने विचार सुरु

रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने नुकताच उमेदवार जाहीर केला. त्यापाठोपाठ आता मावळ लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 18, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Lok Sabha Vanchit Party

Photo Courtesy : Team Dainik Maval


वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने नुकताच उमेदवार जाहीर केला. त्यापाठोपाठ आता मावळ लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. वंचितकडून मावळ लोकसभेत स्‍थानिक आगरी, कोळी समाजातील उमेदवाराला प्राधान्य मिळेल, असे सांगण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवड तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत-खालापूर या विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभेत समावेश होतो. 2009 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन बाबर विजयी झाले, तर त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचेच श्रीरंग बारणे विजयी झाले. ( Prakash Ambedkar Will Give Vanchit Bahujan Aghadi Party Candidate In Maval Lok Sabha Constituency )

2019 मधील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उरण तालुक्यातील आगरी, कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांना या निवडणुकीत 75,904 मते पडली होती. त्यांना संपूर्ण मतदानाच्या एकूण 5.54 टक्के मतदान झाले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण व कर्जत या विधानसभा मतदारसंघात आगरी- कोळी समाजाचे प्राबल्य आहे. राजाराम पाटील यांना पडलेली मते लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आगरी, कोळी समाजाचा उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरून आघाडी फिस्कटली. वंचित बहुजन आघाडीने दलित आणि बहुजनांचे वर्चस्व असलेल्या अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अशात वंचित बहुजन आघाडीने रायगड लोकसभा मतदारसंघात ताकदीचा उमेदवार दिलाय. त्याप्रमाणे आता मावळ लोकसभा मतदारसंघात देखील सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– ‘मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे’ – बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha
– हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या सणांच्या दिवशी लोणावळा विभागातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Lonavala News
– ‘महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर देखील कारवाई होईल’ – बाळा भेगडे । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश । Pune News

Next Post

‘देवाकडे प्रार्थना करतो, ही महायुती टिकून राहावी… पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही’ – आमदार सुनिल शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NCP MLA Sunil Shelke

'देवाकडे प्रार्थना करतो, ही महायुती टिकून राहावी... पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही' - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.