चाकण येथील महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडमधून तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन ( sanitary napkin vending and disposal machine ) देण्यात आले. ह्या मशीनते उद्घाटन आणि हस्तांतरण बुधवारी (दि. 24 एप्रिल) कऱण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ॲड. पु.वा. परांजपे विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांच्या दुरदर्शी मार्गदर्शनाखाली शाळेची प्रगती होत आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेला प्रतिसाद म्हणून महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड, चाकण कंपनी मार्फत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीचे हेड कमर्शिअल प्रसाद पादीर होते. सीनियर एक्झिक्यूटिव्ह कमर्शिअल दिनेश भोसले, बाबाराजे ढाकणे व एक्झिक्यूटिव्ह कमर्शिअल मंगेश जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात आले. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन उद्घाटन व हस्तांतरण संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. पु.वा.परांजपे विद्यामंदिराच्या पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी शाळेचा ऐतिहासिक वारसा त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम, शाळेतील भौतिक सुविधा, त्याचप्रमाणे शाळेचा उंचावत जाणारा यशाचा आलेख इ. विषयी माहिती देत महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेऊन केलेल्या भरीव मदतीबद्दल ऋण व्यक्त केले.
महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीचे हेड कमर्शिअल प्रसाद पादीर यांनी आपल्या मनोगतातून कंपनीच्या सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायत त्याचप्रमाणे विविध शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, वृक्षारोपण आदी कंपनी मार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कंपनीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेच्या वतीने शाल बुके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले. आभार ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती दुर्गा भेगडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ( Mahindra Company Gave Sanitary Napkin Vending and Disposal Machine to Paranjape School Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– महागांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी साबळे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election
– संतापजनक ! अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी, कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime
– काय सांगता ? अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ लोकसभेसाठी ‘संजय वाघेरे’ नावाने उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha