व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे आवाहन । Pune News

यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकांनी परवानगी घेण्याकरिता विकास परवानगी विभागाकडे एकूण 176 प्रकरणे दाखल केली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Unauthorized-Advertisement-Hoardings

File Image


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकांनी परवानगी घेण्याकरिता विकास परवानगी विभागाकडे एकूण 176 प्रकरणे दाखल केली आहेत. प्राधिकरण कार्यक्षेत्रामध्ये होर्डिंग पडून, कोसळून दुर्घटना होणार नाही याची खबरदारी म्हणून महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांच्या अध्यक्षतेखाली आकाशचिन्ह कक्ष (कारवाई विभाग) तहसिलदार तथा कक्ष प्रमुख सचिन मस्के यांच्या कारवाई पथकाने आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारकात जनजागृती केली. ( Appeal to remove unauthorized advertisement boards in PMRDA area Pune News )

या कारवाईत वाऱ्याला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जाहिरात फलकावरील पत्रा, कापड स्वतःहून काढण्यास प्रवृत्त करण्यात आल्याने बऱ्याच फ्लेक्सधारकानी फ्लेक्सवरील पत्रा, कापड स्वतःहून काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच 5 आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारक यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःहून निष्कासित केले आहेत.

प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत, धोकादायक आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरित स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा ते निष्कासित करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही पीएमआरडीएचे विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांनी कळविले आहे.

अधिक वाचा –
– कामशेत येथे इनोव्हा कारचा भीषण अपघात ! सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघींवर काळाचा घाला । Kamshet Accident
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– मावळचा ‘रणसंग्राम’ : मावळ लोकसभेसाठी 38 उमेदवारांकडून एकूण 50 नामनिर्देशन अर्ज दाखल, पाहा संपूर्ण यादी । Maval Lok Sabha


Previous Post

कै. सोपानराव ( आण्णा ) म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ आज वडगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा । Vadgaon Maval

Next Post

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार – Video

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Burning Bus on Mumbai Pune Expressway

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार - Video

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.