व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण हुकले आणि चिमुकल्यासह 2 नाहक बळी गेले; टाकवे खुर्द हद्दीत महामार्गावर भीषण अपघात

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (दि. 28) रात्री भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात एका चिमुकल्यासह दोघांचा बळी गेला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
car accident on old Mumbai Pune highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


car accident on old Mumbai Pune highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (दि. 28) रात्री भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात एका चिमुकल्यासह दोघांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे, रा.मळवली ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस (Lonavala Gramin Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून कार चालक प्रविण नागू लोहार (वय 34 वर्षे रा. पवळे ता. मावळ, सध्या रा. मळवली ता. मावळ) याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वी 304 (A) 279, 337, 338 आणि मो. वा. का. क. 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

रविवारी (दि. 28 एप्रिल) रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास मौजे टाकवे खु. (ता.मावळ) गावचे हद्दीमध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. अपघातात बबन राघु सुतार (वय 50 वर्षे, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) आणि आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10 वर्षे, रा. जाधववाडी नवलाख उंबरे ता.मावळ) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे, रा.मळवली ता. मावळ), प्रविण नागू लोहार (वय 34 वर्षे रा. पवळे ता. मावळ, हल्ली रा. मळवली ता. मावळ) आणि रक्तेश बाबासाहेब सोनवणे (वय 21 वर्षे रा. भाजे ता. मावळ) हे तिघे जखमी झाले आहेत. ( Two people died in car accident on old Mumbai Pune highway in limits of Takve BK village )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री 12च्या सुमारास मौजे टाकवे गावच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका कॉर्नरवर आरोपी वाहनचालक प्रविण नागू लोहार याने त्याचे ताब्यातील i20 कार (क्रं. MH.14 FS. 6578) ही कार्ला फाटा येथून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगामध्ये चालवली. यात टाकवे गावच्या हद्दीत महामार्गावर कॉर्नरला अतिवेगामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला खाली खड्ड्यामध्ये पडली. त्यामध्ये तीन जण जखमी झाले. तर बबन राघु सुतार (वय 50 वर्षे) आणि आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10 वर्षे) यांचा मृत्यू झाला. असे फिर्यादीत नमुद आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सब इन्सेक्टर भारत भोसले (PSI) हे करत आहेत.

अधिक वाचा –
– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो
– वडगाव शहरात महाविकासआघाडीने पेटवली संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची ‘मशाल’ । Vadgaon Maval
– “…आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील” – संजय राऊत । Maval Lok Sabha 


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात 1 मे रोजी पार पडणार 11 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; वधू-वरांना मिळणार कपडे, अलंकार, संसाराच्या वस्तू आणि बरंच काही

Next Post

ठरलं तर ! मावळातील 25 लाख मतदारांपुढे नवा खासदार निवडण्यासाठी 33 पर्याय, पाहा अंतिम उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha Constituency 33 Candidates Will Contest Election

ठरलं तर ! मावळातील 25 लाख मतदारांपुढे नवा खासदार निवडण्यासाठी 33 पर्याय, पाहा अंतिम उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.