व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खर्चात तफावत आढळल्याने श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस ! Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 8, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Shrirang Barane Sanjog Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. त्यात निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीत श्रीरंग आप्पा चंदू बारणे, संजोग भिकू वाघेरे पाटील आणि माधवी नरेश जोशी या तीन उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आली आहे. त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांना नोटीस दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

नोटीसमध्ये नमूद केले आहे की, 33-मावळ लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक, 2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपले प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उमेदवाराचा खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या खर्चाची तपासणी केली असता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही, अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे. ( notices issued to Shrirang Barane Sanjog Waghere regarding discrepancies in expenses Maval Lok Sabha )

अमान्य तफावतीबाबत सदरची नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत आपला खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीच्या वेळी सदर निवडणूक खर्चाचे 33 मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च आपणांस मान्य आहे, असे गृहीत धरुन आपल्या निवडणुक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल. असे नोटीशीत आहे.

निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखी तपासणीकरीता उपलब्ध करून न दिल्याबाबत मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील 6 उमेदवारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून दिले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– “मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘ईव्हीएम मशीनमध्ये चीप बसवून उमेदवाराला जास्त मतदान करून देतो’ अशा बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला अटक

Next Post

विविध धार्मिक कार्यक्रमांसह संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांची 707 वी पुण्यतिथी तळेगाव येथे साजरी । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sant-goroba-kaka

विविध धार्मिक कार्यक्रमांसह संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांची 707 वी पुण्यतिथी तळेगाव येथे साजरी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.