व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई

घाटकोपर मुंबई येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर, अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वडगाव नगरपंचायत प्रशासन खबरदार झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 20, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat Administration Inspected hoardings

Photo Courtesy : Team Dainik Maval


घाटकोपर मुंबई येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर, अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकृत/अनधिकृत होर्डिंग, उंच लोखंडी मनोरे, उंच लोखंडी ढाचे इत्यादीची नगरपंचायत प्रशासक मुख्याधिकारी मुख्य डॉ. प्रवीण निकम यांनी सहाय्यक नगरचनाकर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात असणारे तसेच, रस्ते विकास महामंडळाच्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत एकूण 12, तळेगाव-उर्से रस्त्याच्या लगत 4, व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या रस्त्याच्या हद्दीत 9 असे एकूण छोटे मोठे पंचवीस होर्डिंग शहरात सध्या अस्तित्वात आहेत. नगरपंचायत मार्फत सर्व होर्डिंग मालकांना नोटीस देऊन सात दिवसाच्या आत नवीन स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल न. प. कार्यालयास सादर करणेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ( Vadgaon Nagar Panchayat Administration Inspected hoardings in city )

तसेच अनधिकृत होर्डिंग धारकांनी विहित नमुन्यात परवानगी घ्यावी, अन्यथा अनधिकृत होर्डिंग तात्काळ काढण्यात यावे व तसेच रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत असणाऱ्या होर्डिंगधारकांनी सदर कार्यालयाकडून परवानगी घेतली असल्यास त्यांची एक प्रत व संरचनात्मक तपासणी अहवालाची एक प्रत नगरपंचायत कार्यालयात जमा करावी. अन्यथा शहरातील सर्व अनाधिकृत होर्डिंग नगरपंचायत मार्फत काढून टाकण्यात येईल व येणारा खर्च होर्डिंग धारकांकडून वसूल करण्यात येईल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाही करण्यात येईल, तसेच यापूर्वी नगरपंचायत मार्फत लेखी व तोंडी स्वरूपात शहरातील होर्डिंग धारकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील होर्डिंग्स हटवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोमवारपासून (दि. 20 मे) रस्ते विकास महामंडळ व नगरपंचायत यांच्या मार्फत संयुक्त रित्या शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स काढण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या सूचना नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News
– वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब काळे यांचा चिठ्ठीवर विजय !
– तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व होर्डिंग अनधिकृत ? । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News

Next Post

मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.