व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे आदेश मानले नाहीत. काही प्रमाणात काम केले नाही., असेही बारणे म्हणाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 21, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
shrirang barne and ajit pawar

Photo Courtesy : FB / Shrirang Barne & Sunil Shelke


‘महायुतीच्या मित्र पक्षांनी मनापासून काम केले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के विजयी होणार असून 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजयी होईल,’ असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

खासदार बारणे यांनी आज, मंगळवारी (दि. 21 मे) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘मावळमध्ये महायुतीची ताकद होती, आहे आणि राहील. ‘उबाठा’ची कुठेही ताकद नाही. शेकापची उरण, पनवेलला ताकद आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या सर्व आमदारांनी मनापासून काम केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांनीही काम केले आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के निवडून येणार आहे. 2 लाख 50 हजार 374 मतांनी मी विजयी होईल. मागील दोन्ही निवडणुकीत माझा अंदाज खरा ठरला आहे. बूथनिहाय अंदाज काढला आहे,” याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.

“चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार 700 मतांपैकी मला 2 लाख 5 हजार 683 मते पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 95 हजार 973 मतदान झाले. त्यापैकी 1 लाख 76 हजार मतदान मला पडेल. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही,” असा दावा खासदार बारणे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल तक्रार –
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे आदेश मानले नाहीत. काही प्रमाणात काम केले नाही. बाकी सर्वांनी मनापासून काम केले. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त्यांनी काम केले असता तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले असते,” असेही खासदार बारणे म्हणाले.

“आजपर्यंतच्या निवडणुकीत व्यक्तीगत आरोप कोणी केले नव्हते. पार्थ पवार, लक्ष्मण जगताप यांनीही व्यक्तीगत आरोप केले नव्हते. पण, संजोग वाघेरे यांच्याकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. त्यामुळे वाघेरे यांनी व्यक्तीगत आरोप केले,” याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. ( Maval Lok Sabha Election 2024 Results Mahayuti candidate Shrirang Barane criticizes NCP Party Workers )

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.73 टक्के, ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल
– बारावीचा निकाल चेक करण्यासाठी लिंक, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024
– बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024


dainik maval jahirat

Previous Post

बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल

Next Post

पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune hit and run case

पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील 'ते' दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.