व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime

महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 1, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Dehu-Road-Police-Station

File Image - Dehu Road Police Station


महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश आले आहे. दिनांक 14 मे रोजी देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध सुरू होता. अखेर अत्यंत शिताफीने पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हा 272/2024 कलम 354 भा.द.वि अन्वये गुन्ह्यातील फिर्यादी महिला यांनी दिनांक 14 मे 2024 रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी या कोरेगाव पार्क येथे आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरीता कॅब (क्र. एम.एच. १४ एल.बी. ४१३३) याने जात असताना कॅब चालक राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) याने सदरची कॅब कोरेगाव पार्क दिशेने न नेता उलट दिशेने देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणली. तिथे त्याने महिलेच्या एकटेपणाचा फायदा उचलून वाहनामध्ये विनयभंग केला. त्यानुसार त्यावर देहुरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Dehu Road Police succeeded in arresting Ola cab driver who absconded after molesting woman )

गुन्हा दाखल झाल्यापासून कॅब चालक आरोपी राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगाव, पिंपरी- चिंचवड) हा आपले अस्तित्व लपवून पुणे शहरातंर्गत वावरत होता. त्याचा कोणताही प्रकारचा संपूर्ण पत्ता व माहिती नसताना देहुरोड पोलीस स्टेशनचे तपास पथकाच्या अधिकारी, अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन सदर आरोपीचा पत्ता शोधुन काढून त्यास शिताफीनी पकडून दाखल गुन्ह्यामध्ये अटक केली. तसेच गुन्ह्यामधील वापरती कॅब (क्र. एम.एच. १४ एल.बी. ४१३३) ही सुध्दा अटक आरोपीकडून जप्त केली आहे. अधिकचा तपास देहुरोड पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्‍त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्‍त परिमंडळ-२ बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोउपनि पी.टी खनसे, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana
– मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट
– तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation


Previous Post

पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates

Next Post

कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of caste certificates

कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली... वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
Water supply scheme worth Rs 39 crore inaugurated at Vadgaon Maval initiative of MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा

March 28, 2026
Stormy wind and rain image

राज्यात दिनांक ३० आणि ३१ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 28, 2026
Shri Ram Navami celebrations in full swing in Dhangavhan village of Maval

मावळातील धनगव्हाण गावात श्रीराम नवमी सोहळा उत्साहात ; प्रभू श्रीराम जन्मोत्सव व करंजूआई देवी उत्सव निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न

March 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.