व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘देशाचं चित्र बदललंय, यामध्ये महाराष्ट्राची भूमिका प्रमुख आहे’, वाचा नेमकं काय म्हणाले शरद पवार । Lok Sabha Election Results

देशात आज (दि. 4 जून) लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. देशातील 543 मतदारसंघात मतमोजणी सुरू असून एनडीएला धक्का देणारे निकाल समोर येत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
SHARAD-PAWAR

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशात आज (दि. 4 जून) लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. देशातील 543 मतदारसंघात मतमोजणी सुरू असून एनडीएला धक्का देणारे निकाल समोर येत आहेत. एनडीएच्या 400 पार जागांच्या स्वप्नांना सुरंग लागल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली असून महायुतीला जोरदार फटका बसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. 4 जून) मतमोजणी सुरु असतानाच पत्रकार परिषद घेत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच एका पत्रकाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय म्हणालेत शरद पवार?
“लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना ( उ.बा.ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादा पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटीबद्ध होती. ह्या भुमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि म.वि.आ. वर विश्वास दाखवला याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.”

“श्री. राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते श्री. नाना पटोले, श्री. बाळासाहेब थोरात, श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भुमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द आपणास देतो.”

“ह्या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे. ह्यात महाराष्ट्राची प्रमुख भुमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू. अतिशय संचर्षपुर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली त्याबद्दल जनतेचे मी पुन्हा कण व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद !” ( Lok Sabha Election 2024 Results Live Updates Sharad Pawar reaction on Nikal )

अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा 2024 निकाल : श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण, कुटुंबीयांकडून बारणेंचे औक्षण – पाहा फोटो

Next Post

अजितदादांना मोठा धक्का, पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय । Baramati Lok Sabha Result

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
अजितदादांना मोठा धक्का, पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय । Baramati Lok Sabha Result

अजितदादांना मोठा धक्का, पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय । Baramati Lok Sabha Result

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.