व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे किल्ले विसापूर वरील शिवमंदिराचा जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आठवा वर्धापनदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Shiva temple at Visapur Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे किल्ले विसापूर वरील शिवमंदिराचा जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आठवा वर्धापनदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शंभू महादेवाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यामुळे गडावरील वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबविली. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद इत्यादी तत्सम कचरा गोळा करण्यात आला. विसापूर किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांचे यानिमित्ताने स्वछतेविषयी जागरूकता व प्रबोधन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, संदीप गाडे तसेच, मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सागर दळवी, बसप्पा भंडारी, चेतन जोशी आदी कार्यकर्त्यांनी केले होते. ( Eighth restoration anniversary of Shiva temple at Visapur Fort in Maval celebrated with enthusiasm )

2016 साली पावसाळ्यात विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिर पूर्णपणे ढासळले होते. मंचाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भारतीय पुरातत्व विभागामार्फत 2017 साली शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी मंचाकडून हा दिवस जीर्णोद्धार वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे.

लोहगड विसापूर विकास मंच –
लोहगड विसापूर विकास मंच गेली 25 वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहे. लोहगड ग्रामस्थांच्या सहकार्यातून लोहगडवरील शिवमंदिर जीर्णोद्धार व पायथ्याला भव्य शिवस्मारक उभारण्यात आले आहे. नुकतेच भारत सरकारद्वारे लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ्यांच्या यादीत नामांकनासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे, ही बाब मावळवासियांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे उर्वरित गडसंवर्धनाची कामे जसे लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी तसेच, विसापूर किल्ल्यावरील संवर्धनाची कामे ताबडतोब सुरु करण्यात यावी अशी मागणी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली.

अधिक वाचा –
– कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News
– शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार
– आनंदवार्ता ! अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर । Maharashtra Sadan In Ayodhya


Previous Post

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Next Post

घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून पत्नीने केली बडबड, पतीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Husband committed suicide

घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून पत्नीने केली बडबड, पतीची आत्म'हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.