व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जयंत पाटील साहेब… आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा’, आमदार सुनिल शेळकेंचे जयंत पाटलांबाबत मोठे विधान । Sunil Shelke & Jayant Patil

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी मोठे विधान केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Sunil Shelke big statement about Jayant Patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


MLA Sunil Shelke big statement about Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी मोठे विधान केले आहे. जयंत पाटील साहेबांसारखे जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, याचं आम्हाला समाधान आहे. पण जयंत पाटलांना पक्षातील नवीन नेते डावलू पाहतायेत, असा आरोप आमदार सुनिल शेळके यांनी केला. तळेगाव येथे त्यांनी माध्यमांशी याविषयावर संवाद साधला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘जयंत पाटील साहेबांसारखे ज्येष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे, याचे आम्हाला समाधान आहे. पण त्यांच्या मनामध्ये काही नक्कीच आहे. पक्षामध्ये त्यांना सारखं सारखं डावलल जाणं, त्यांना पक्षातून बाजूला ठेवणं हे पक्षातील काही नवीन नेते करू पहात आहेत. जयंत पाटील साहेबांना हेच सांगणे आहे, राज्याचे अभ्यासू नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( NCP Ajit Pawar MLA Sunil Shelke big statement about Jayant Patil )

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्ष पदी दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना युवक अध्यक्ष करण्यासाठी रोहित पवार हे आग्रही होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे असलेले मेहबूब शेख यांची नेमणूक कायम ठेवल्याने आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. त्यात जयंत पाटील यांनी आपण काही दिवसांसाठी प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांनी म्हणजे अजित पवार गटातील नेत्यांनी आपल्याकडे येण्याची विनंती केली आहे. त्यात आता जयंत पाटील यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा असल्याचे आमदार शेळके यांनी म्हटल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अधिक वाचा –
– पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन
– घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करताय? मग ही बातमी नक्की वाचा, सरकारी सबसिडी आणि योजनांची माहिती एका क्लिकवर
– विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


Previous Post

महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणूकीपूर्वीच होणार पुणे रिंगरोडचे भूमिपूजन, ‘या’ ठिकाणचे जमिनीचे संपादन पूर्ण । Pune Ring Road Update

Next Post

आमदार सुनिल शेळके यांनी घेतली माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची सदिच्छा भेट । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke Met to former MLA Krishnarao Bhegde

आमदार सुनिल शेळके यांनी घेतली माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची सदिच्छा भेट । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.