एकीकडे तळेगाव नगरपरिषद आकारलेल्या वाढीव करावरून चर्चेत असतानाच पालिकेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मद्य प्राशन करून कार चालवत दोन वाहनाला धडक दिली होती. त्यामुळे तळेगावकर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यात आता ‘तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी’ अशा आशयाचा फलक शहरात चर्चेचा ठरत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांनीही या मोहिमेत मुख्याधिकाऱ्यांच्या व्यसनमुक्तीसाठी एक रुपयाचे दान दिल्याने आता सर्व स्तरातून याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन गजानन देशपांडे आणि चंद्रशेखर शिंदे यांच्याकडून हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. “तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी” अशा आशयाचा फलक घेऊन संबधित नागरिक सार्वजनिक ठिकाणी जात असून याबाबत तळेगावमध्ये चर्चा होत आहे. ( Talegaon Dabhade Nagar Parishad CEO NK Patil Protested by Citizens through campaign )
प्रकरण काय?
दिनांक 1 जून रोजी तळेगावात मुख्याधिकारी एन.के. पाटील मद्यप्राशन करून गाडी चालवत होते व त्यामध्ये त्यांनी दोन गाड्यांना ठोकर देऊन नुकसान केले. यामध्ये जीवितहानी झाली नाही. परंतु मेडिकल रिपोर्ट हा अल्कोहोल पॉझिटिव्ह आला. सदर व्यक्तीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन गजानन देशपांडे व चंद्रशेखर शिंदे यांनी लोकवर्गणीतून मुख्य अधिकाऱ्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचे ठरवले आहे आणि जमलेले पैसे हे प्रांतांकडे सुपूर्द केले जातील.
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News
– वडगाव येथे मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त आढावा बैठक संपन्न
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची सदिच्छा भेट । MLA Sunil Shelke