शनिवारपासून (दि. 15) राज्यातील शाळा सुरू झाल्या. शासनाच्या सुचनेनुसार सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश होत असताना प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यातील शाळाही शनिवारपासून सुरू झाल्या. उन्हाळ्याची सुटी संपून शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट शाळेच्या प्रांगणात ऐकू येवू लागला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी येथे शनिवारी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी प्रवेशोत्साह कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी वाळुंज हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. ( Admission ceremony of students at Zilla Parishad School Ambi Maval )
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल बनसोडे आणि अन्य मान्यवर व्यक्ती यांच्या हस्ते नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंथन परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे यावेळी कौतूक व अभिनंदन करण्यात आले.
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे
– माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News
– भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News