विकेंडला जोडून सोमवारी बकरी ईद आल्यामुळे शनिवार – रविवार – सोमवारी अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर आणि भागातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. पाऊस नसतानाही केवळ गारव्यासाठी पर्यटकांनी येथे धाव घेतली. तसेच रविवार असल्याने मुंबई, ठाणे, कोकणातून भाविकांनी कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. एकूणच जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने बहुतांश महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सलग तीन सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी लोणावळा शहराकडे धाव घेतली होती, त्यामुळे शहरातील आणि अन्य पर्यटनठिकाणची हॉटेल्स, खासगी बंगले, रिसॉर्ट्स हाऊसफुल झाली होती. पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूकीवरही त्याचा ताण पडला. शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. ( Crowd of tourists and traffic congestion due to weekend in Lonavala city and area )
सलग तीन सुट्ट्यांमुळे कार्ला, भाजे लेणी परिसर, लोहगड – विसापूर किल्ले परिसर येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांची हद्दीतील वाहतूक कोंडी आणि पर्यटकांवर नियंत्रण मिळवताना मोठी कसरत करावी लागल्याचे पाहायला मिळाले. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर कार्ला फाटा येथे वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरिक्षक भारत भोसले, किशोर शिवते यांनी ही कोंडी सोडविली.
रविवार असल्याने कार्लागडावरील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी ठाणे, मुंबई, कोकण भागातून मोठ्या संख्येने भाविक गडावर आले होते. त्यामुळे दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दर्शन लांबल्याने गर्दी झाली होती. त्यामुळे गडावर गर्दीचा नवा उच्चांक नोंदवला गेला.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे
– माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News