व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंढरीची वारी ठरणार ‘आरोग्यवारी’ ! पालखी मार्गावर मिळणार आरोग्य विषयक सेवा-सुविधा, वाचा सविस्तर

देहू-आळंदी ते पंढरपुर तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो पालख्या, दिंड्या मार्गावर आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Wari Warkari will get health care facilities

Photo Courtesy : Team Dainik Maval


आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी राज्यात पालखी सोहळा सुरू झाला असून 13 जूनला श्री संत गजानन महाराज मंदिर ‘श्रीं’च्या पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर आतापर्यंत (14 जून) एकूण 1 हजार 763 वारकऱ्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, देहू-आळंदी ते पंढरपुर तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो पालख्या, दिंड्या मार्गावर आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. ( Pandharpur Ashadhi Wari Warkari will get health care facilities on Palkhi route )

महाराष्ट्रातील विविध पालख्यांच्या मार्गावर देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा-सुविधा :
1. आरोग्य विभागाकडून एकूण 6 हजार 368 अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत महाराष्ट्रातील विविध पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
2. 258 तात्पुरत्या ‘आपला दवाखान्या’च्या माध्यमातून (प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर 1 याप्रमाणे) मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.
3. 707 (102 व 108) रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर 24×7 पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
4. पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन 4 आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत.
5. 212 आरोग्यदुतांमार्फत (बाईक ॲम्बुलन्स) पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

6. 5 हजार 885 औषधी किटचे विविध दिंडी प्रमुखांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
7. 136 हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणी तसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे.
8. महिला वारकऱ्यांसाठी 136 स्त्रीरोग तज्ज्ञ पालखी मार्गावरील रुग्णालयामध्ये कार्यरत असतील.
9. पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी 5 बेडची क्षमता असलेले 87 अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले आहेत.
10. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात येत असून, पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
11. पालखी मार्गावर 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात येत आहे.
12. पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade
– मावळ प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून नवलाख उंब्रे येथील श्रीराम मंदिराजवळ वृक्षारोपण । Maval News
– तळेगाव दाभाडेमधील हॉटेल थंडा मामला येथे चोरी । Talegaon Crime


Previous Post

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post

एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
70 year old men cured of cancer in maval through AI technology

एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.