व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अर्धी लढाई जिंकली ! तळेगाव नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगितीचा आदेश नगरविकास खात्याकडून जारी, आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या करवाढीला स्थगिती देणारा आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी (दि. 20) जारी केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2024
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Talegaon Nagar Parishad

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या करवाढीला स्थगिती देणारा आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी (दि. 20) जारी केला. आमदार सुनिल शेळके यांच्या विनंतीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत नगर विभागाला सूचना केली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करपुनर्मूल्यांकन करुन शहरातील मिळकतधारकांना वाढीव कर आकारणीबाबत नोटीस बजावल्या होत्या. प्रस्तावित दरवाढ ही 50 ते 200 टक्के असल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. आमदार शेळके यांनी 12 जूनला मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शासनाने या बेकायदेशीर करवाढीला स्थगिती देण्याबाबत लेखी मागणी केली होती.नागरिकांनी वाढीव कर भरु नये तसेच करवाढी विरोधात हरकत नोंदवावी,असे आवाहनही त्यांनी केले होते. ( An order suspending tax hike of Talegaon Nagar Parishad has been issued by Urban Development Department )

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि.ना.धाईंजे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून वाढीव कर आकारणीस स्थगिती दिली आहे. नगरविकास खात्याच्या आदेशात म्हटले आहे की, सध्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये सन 2024-2025 ते सन 2027-2028 या कालावधीतील चतुर्थ वाषिक कर आकारणीची प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रक्रियेबाबत मा.विधानसभा सदस्य यांनी वस्तुस्थिती नमूद करुन सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याची विनंती केली आहे.त्यावर मा.मुख्यमंत्री महोदयांनी,सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे सध्या “प्रशासक” असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम-169 अतंर्गत समिती अस्तित्वात नाही. सदर वस्तुस्थिती विचारात घेता, नविन अपिलीय समिती अस्तित्वात येईपर्यंत सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत आपणास कळविण्याचे मला निर्देश आहेत,असे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

‘नगरपरिषदेने केलेल्या कर आकारणी विरोधात राज्य शासनाने जीआर काढून स्थगिती दिल्याबद्दल तळेगावातील जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानतो.’ – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन
– थरारक ! तळेगाव दाभाडे शहरात हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण । Talegaon Dabhade
– माणूसपण हरवत चाललेल्या जगात माणूसकीचा नवा आदर्श घडवणारे मावळ तालुक्यातील ‘सावंतवाडी’ गाव आणि तेथील ग्रामस्थ !


Previous Post

वतन इनामी जमिनीबाबत कायदा करून कडक अंमलबजावणी व्हावी, रामोशी समाजाच्या जमिनी हडपल्या जात असल्याचा गंभीर आरोप

Next Post

वडगाव मावळ शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी, 250 महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vat Purnima 2024 Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी, 250 महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.