मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवनमावळ विभागात असलेल्या आजिवली या दुर्गम खेड्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळा, जवण येथील शिक्षक गणेश पाटील ( Ganesh Patil ) सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक-शिक्षक-शिक्षकेतर संघ ( Khed Taluka Teachers Union ) यांकडून दरवर्षी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ( Meritorious Teacher Award ) देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार गणेश पाटील यांना जाहीर करण्यात आला असून सध्या पाटील सर यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असलेले गणेश पाटील सर हे परिसरात प्रामाणिक आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना चाकोरीबाहेरील जग दाखवणे आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी गणेश पाटील सरांना ओळखले जाते.
त्यांना जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रामाणिक ज्ञानदानाच्या कार्याचा गुणगौरव असून आजवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप टाकणाऱ्या शिक्षकाच्या पाठीवरच पडलेली ही कौतूकाची आणि सन्मानाची थाप आहे. ‘गणेश पाटील सर यांना आजवर पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, रोटरी क्लब लोणावळा आदी पुरस्कार मिळाले आहेत.’ तब्बल 23 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या गणेश पाटील सर यांना मिळत असलेला जिल्हास्तरीय पुरस्कार ही विद्यालयासाठीही गौरवाची बाब आहे. ( Ganesh Patil Has Been Announced District Level Meritorious Teacher Award By Khed Taluka Teachers Union )
अधिक वाचा –
कौतुकास्पद! बऊर शाळेतील शिक्षिकेला आदर्श शिक्षिका पुरस्कार
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!