व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींबमधील ‘अंजनवेल’ येथे ‘द्रौपतीमाला पुष्प’ फुलांना बहर ! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

पवन मावळ भागातील शिळींब येथे असलेले प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र 'अंजनवेल' सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. एका खडक माळरानावर गेल्या काही वर्षांत विविध प्रजातींच्या झाडांची लागवड येथे करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 23, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
draupadi mala flower at anjanvel agro tourism

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ भागातील शिळींब येथे असलेले प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र ‘अंजनवेल’ सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. एका खडक माळरानावर गेल्या काही वर्षांत विविध प्रजातींच्या झाडांची लागवड येथे करण्यात आली. आजमितीला अंजनवेल येथे झाडांची गर्द दाटी झाली असून सुंदर रचनेतील घरे आणि विविध उपक्रमांमुळे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र सर्वांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे. शिळींब गावातील युवा प्रगतशील शेतकरी राहुल जगताप आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षांपासून मेहनत घेत हे ठिकाण पर्यटनासाठी विकसित केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सध्या अंजनवेलमध्ये आंब्याच्या, करंजाच्या, सावरीच्या अनेक झाडांवर अतिशय सुंदर फुलांचे घोस लगडताना दिसतायेत आणि ही सुंदर फुल ऑर्किडची आहेत. काही ठिकाणीं गर्द गुलाबी तर काही ठिकाणी फिकट गुलाबी छटा असलेली साधारण 4 ते 6 इंच लांबीची फुलांची सुरेख वेणी लक्ष वेधून घेते आहे. ह्या ऑर्किडचे नाव आहे – द्रौपदी पुष्प किंवा अमरी! ( draupadi mala flower at anjanvel agro tourism shilimb maval )

हे ऑर्किड झाडाच्या जीर्ण खोडावर वाढत असले आणि त्याची पाने बांडगुळा सारखी दिसत असली तरी हे बांडगुळ नव्हे! हे ऑर्किड फक्त आधारासाठी झाडाच्या खोडाचा वापर करते आणि स्वतः चे अन्न स्वतः तयार करते. वर्षातून फक्त एकदाच उन्हाळा संपून पावसाळा सुरु होताना, साधारण 8-15 दिवस फुलांची हि सुरेख वेणी बघता येते.

मराठीत ऑर्किडला आमरी (अमर ह्या अर्थाने) असं नाव आहे. वनस्पती विश्वात ऑर्किडचे विशेष महत्व आहे. विशिष्ठ प्रकारची परिसंस्था असल्याशिवाय ऑर्किड सहजासहजी वाढत नाहीत. त्यात हवा, माती, पाण्याच्या प्रदूषणाला अतिशय संवेदनशील असलेली हि प्रजाती, जिथे वाढते तो परिसर एका समृद्ध जैव विविधतेचा परिसर मानला जातो. अंजनवेलच्या परिसरात खूप मोठ्या संख्येत सध्या ही ऑर्किडची फुलं फुलली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjanvel Agro Tourism (@anjanvel)

गेल्या 15-20 वर्षांत काही हजार झाडांची लागवड इथल्या खडकाळ माळावर करण्यात आली. एक ओसाड माळरान – त्यावर वाढणाऱ्या अनेक प्रकारच्या गवतांपासून, आता एखादया देवराईत असावी, अशी निरनिराळ्या झाडांची दाटी इथ तयार झाली आहे. एका खडकाळ माळरानावर जंगल उभ करण्याचा प्रयत्नाला आलेलं प्रतीकात्मक फुल म्हणून ह्या ऑर्किडच्या फुलांकडे बघता येईल.

अधिक वाचा –
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात 19 गावे दरडींच्या छायेत ! ‘ही’ 8 गावे संवेदनशील म्हणून घोषित, पुनर्वसन कधी होणार ? । Maval News
– ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा


Previous Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 22 कोटींची विकासकामे…

Next Post

मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
student drowned in Pavana Dam Maval

मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.