व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News

रोटरी क्लब अलिबाग तसेच माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने मयेकर डोंगरी थळ येथे रोटरी जंगल कन्सेप्ट मध्ये ९०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2024
in महाराष्ट्र
Tree plantation

Photo Courtesy : Team Dainik Maval


रोटरी क्लब अलिबाग तसेच माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने मयेकर डोंगरी थळ येथे रोटरी जंगल कन्सेप्ट मध्ये ९०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ अलिबाग शीशोर, माणुसकी प्रतिष्ठान, रायगड मेडिकल असोसिएशन, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तसेच इतर स्वयंसेवी संस्था , थळ ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सरपंच व कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ९०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी येथे जमलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व व त्यामुळे आपले भविष्य कसे उज्ज्वल होईल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच १ जुलै रोजी नवीन भारतीय न्याय संहिता बद्दल जनजागृती करण्यासाठीचे आवाहन करण्यात आले. रोटरी अध्यक्ष डॉक्टर निलेश म्हात्रे यांनी यावेळी उजाड झालेल्या रानात दाट जंगल तयार करून जंगली प्राणीमात्रांना सुरक्षित वातावरण मिळणे ही या मागची संकल्पना असल्याचे सांगितले. ( Tree plantation by Rotary Club Alibaug Manusaki Pratishthan Raigad SP Somnath Gharge )

तर माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांनी वृक्षांच्या रोपणाबरोबरच त्यांचे जतन व संवर्धन करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच याकरिता उन्हाळ्यात रोपांना पाणी देवून त्यांना जगविणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी दरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो यावर्षी १५ ऑगस्ट रोजी वृक्षांचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जन शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, रायगड मेडिकल असोसिएशन समन्वयक डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, थळ ग्रामपंचायत सरपंच सुनील पत्रे, रोटरी भावी अध्यक्ष दिलीप कुमार भड, तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सदस्य व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. तन्वी शेट्ये यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले.

अधिक वाचा –
– धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करा, दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ; खासदार श्रीरंग बारणेंचे पत्र
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ । Vadgaon Maval
– भूतानच्या सीमेवर मावळचा सुपुत्र ! दहिवली गावचे भगवान मावकर यांची ‘नाईक’ पदी नियुक्ती । Karla News


dainik maval jahirat

Previous Post

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय

Next Post

राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pankaja Munde Yogesh Tilekar

राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.