व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्यटनांच्या अनुषंगाने पारित केलेल्या नियमावली आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच प्रतिबंधीत हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांवर धडक कारवाई केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2024
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Selling hookah

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्यटनांच्या अनुषंगाने पारित केलेल्या नियमावली आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच प्रतिबंधीत हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांवर धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 223 व सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम 2003 वे सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) 21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आली. ( Action taken against sellers of banned hookah flavored tobacco products at Tiger Point in Lonavala )

प्राप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी टायगर पॉईट येथे छापा टाकला, तेव्हा मंगेश स्नॅक्स सेटर या दुकानामध्ये मंगेश नंदु कराळे (वय 25 वर्षे रा. खंडाळा ता. मावळ जि. पुणे) व राकेश गणपत वारे (वय 25 वर्षे रा. खोपोली. ता. खालापुर जि. रायगड) हे सार्वजनिकरित्या मानवी जिवितास धोका निर्माण होणारे व शासनाने बंदी घातलेला हुक्का बाळगून आणि विकत असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी वनरक्षक वेदीका रामराव शिर्षे (वय 32, रा. वडगांव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ, पोलिस हवालदार जय पवार आणि पोलिस शिपाई सिद्धेश शिंदे यांनी ही कारवाई केली आणि छापा टाकून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तीक आणि पोलिस निरिक्ष किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले हे करत आहे.

अधिक वाचा –
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News
– खुशखबर ! पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातील जलसाठ्यात 4 टक्क्यांची वाढ । Pavana Dam Updates
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News


Previous Post

चिंचवड शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास प्रारंभ ; खासदार श्रीरंग बारणेंचे महिलांना आवाहन…

Next Post

निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nigde Gram Panchayat Maval

निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.