व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर

अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Godown Warehouse construction grant Subsidy

Photo Courtesy : Team Dainik Maval


अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार असून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्याकरिता २५० मे. टन गोदाम बांधकामासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्यासाठी २ व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत गळीतधान्यासाठी एका गोदाम बांधकामाचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी कमी असलेली अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ( Call for Farmer Producer Unions and Companies to submit applications for Godown Construction Subsidy )

ही योजना बँक कर्जाशी निगडीत असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी, संघ या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाइन्स, तपशील व खर्चाच्या अंदाजपत्रकासह अर्ज सादर करावेत.

शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी अर्जासोबत सभासद यादी, मागील वर्षीचे ऑडीट रिपोर्ट व ७/१२, ८ अ उतारा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

अधिक वाचा –
– चमकदार कामगिरीबद्दल इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेला अनेक पुरस्कार । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! पाण्याचा प्रवाह वाढला, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भुशी धरण बंद, पर्यटकांचा हिरमोड । Lonavala Bhushi Dam Updates
– पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा


Previous Post

कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls

Next Post

लोणावळा – खंडाळा भागात तुफान पाऊस ! बोरघाटात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पाणी साठले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Water accumulated on Mumbai-Pune Expressway

लोणावळा - खंडाळा भागात तुफान पाऊस ! बोरघाटात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पाणी साठले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.