व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाळा भेगडेंवर मोठी जबाबदारी !

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेऊन बारामती, इंदापूर आणि आंबेगावच्या निधीला मोठा कट लावत जिल्ह्यात सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचे धोरण स्वीकारले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 14, 2022
in पुणे, ग्रामीण, शहर
Bala-Bhegade

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप आणि कामे अंतिम करण्याचे नियोजन सध्या भाजपाचे मावळ तालुक्यातील माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पातळीवर सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार बाळा भेगडे तसेच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

novel skill dev ads

पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यामधील भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातील स्थानिक नेते, कार्यकते यांच्याशी समन्वय साधून कामांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ( Chandrakant Patil Gave Pune District Fund Distribution Responsibility To BJP Maval Bala Bhegde )

tata ev ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

24K KAR SPA ads

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांवर प्रशासक असल्याने सन 2022-23च्या संपूर्ण निधीचे वाटप आणि कामांचे नियोजन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीनुसार करण्यात आले. त्यामुळे एकूण निधीचा 60 टक्के निधी एकट्या बारामती, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यात वाटप करण्यात आला आणि शिल्लक 40 टक्के निधीचे अन्य दहा तालुक्यांत वाटप करण्यात आला होता, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा – व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेऊन बारामती, इंदापूर आणि आंबेगावच्या निधीला मोठा कट लावत जिल्ह्यात सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार आता नव्याने जिल्हा नियोजन समितीच्या कामांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून ग्रामीण भागातील कामांची यादी मागवण्यात येत आहे. बाळा भेगडे आणि राहुल कुल हे सर्वांकडून याद्या घेऊन कामे निश्चित करण्याचे काम करत आहे.

पुणे जिल्ह्यासाठी सध्या 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 875 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी वाटप आणि नियोजन करण्याची जबाबदारी आता भेगडे आणि कुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

अधिक वाचा –

– बऊरमध्ये श्रीगणेश मूर्ती प्राण-प्रतिष्ठा सोहळा संपन्न, हभप सचिन महाराज जाधव यांच्या कीर्तनाला हजारोंची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ‘या’ 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड


dainik maval ads

Previous Post

बऊरमध्ये श्रीगणेश मूर्ती प्राण-प्रतिष्ठा सोहळा संपन्न, हभप सचिन महाराज जाधव यांच्या कीर्तनाला हजारोंची उपस्थिती

Next Post

मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार, 72 तासात 2 गुन्हे दाखल झाल्याने निर्णय, आव्हाडांच्या ट्विटमुळे खळबळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jitendra-Awhad

मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार, 72 तासात 2 गुन्हे दाखल झाल्याने निर्णय, आव्हाडांच्या ट्विटमुळे खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Good news PMPML starts new tourist bus service on Pune to Lonavala route

आनंदाची बातमी ! ‘पीएमपीएमएल’कडून पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू । PMPML Tourist Bus Pune to Lonavala

July 18, 2025
Dr Babasaheb Ambedkar memorial

लोणावळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ५६ लक्ष निधीची मंजुरी

July 18, 2025
10-foot python found in Aundhe village in Maval

मावळमधील औंढे गावात आढळला 10 फुटांचा अजगर

July 18, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगाव दाभाडे : दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी तळेगाव पोलीस स्टेशनतर्फे एकत्रित बैठक । Talegaon Dabhade

July 18, 2025
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रभाग रचनेवर आक्षेप

July 18, 2025
PMRDA DP and service road projects also cancelled Farmers celebrate at Urse Toll Plaza

‘पीएमआरडीए’ डीपी सह सेवा रस्ता प्रकल्पही रद्द ; उर्से टोलनाका येथे शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव

July 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.