व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विजेच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे – आमदार शेळके

आंदर मावळ भागात मागील काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत असून विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 20, 2024
in लोकल, ग्रामीण
Irregular electricity supply in Andar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अधिक क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर आंदर मावळ भागातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी होईल, अशी आशा आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आंदर मावळ भागात मागील काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत असून विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आमदार सुनिल शेळके यांनी (गुरुवारी) आंदर मावळातील गावांमध्ये वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत जाऊन स्थानिकांकडून समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आमदार शेळके यांच्या बरोबर राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, वडगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गीते, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, आंदर मावळमधील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

विजेच्या लंपडावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसत आहे. वीज कंपन्यांची देखभाली बाबतची अनास्था यामुळे पावसाळ्यात विद्युत अपघातांचे प्रमाण देखील वाढते. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक गावात जाऊन पाहणी केली. या समस्यांवर काय उपाययोजना करता येतील याची माहिती देखील यावेळी घेण्यात आली. त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अधिक वाचा –
– पिंपरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘भव्य विजयी संकल्प मेळावा’, अजित पवारांच्या पक्षाला खिंडार पाडल्यानंतर पहिलीच सभा
– मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर
– ‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके


Previous Post

येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन

Next Post

द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ! कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअपची ट्रकला धडक, चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident on Mumbai Pune Expressway

द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ! कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअपची ट्रकला धडक, चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.