व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News

हवामान विभागाने दिलेल्या जोरदार पावसाच्या इशाऱ्याचे कारण देत प्रशासनाकडून 27 जुलैपासून पुन्हा एकदा मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळापर्यंत बंदी घातली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Lonavala Khandala Taxi Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हवामान विभागाने दिलेल्या जोरदार पावसाच्या इशाऱ्याचे कारण देत प्रशासनाकडून 27 जुलैपासून पुन्हा एकदा मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळापर्यंत बंदी घातली आहे. प्रशासनाच्या निर्णयाने पर्यटनावर अवलंबून असलेली हजारो कुटुंब अडचणीत सापडली आहेत. प्रशासनाच्या या पर्यटन बंदी विरोधात लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या (Lonavala Khandala Taxi Association) वतीने सोमवारी पायी मोर्चा काढण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

Novel NIBR Ads

मावळ तालुक्यातील लोणावळा हे शहर सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. त्यामुळेच येथे वर्षाविहारासाठी लाखो पर्यटक येत असतात. दरवर्षी येणारे पर्यटक यांमुळे येथील हजारो नागरिकांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून राहिलेली आहे. परंतू यंदा प्रशासनाकडून सातत्याने पर्यटन बंदी लावली जात आहे. मावळ व मुळशी तालुक्यामधील अनेक गावे ही फक्त पर्यटनावर अवलंबून आहेत. फक्त लोणावळा शहराचा विचार केला तर शहरातील संपूर्ण अर्थकारण आणि उपजीविकेचे साधन हे पर्यटनावर आधारित आहे. टॅक्सिचालक, रिक्षा चालक, टपरीधारक, हॉटेल व्यवसायासह इतर व्यावसाय करणारी हजारो कुटुंब पावसाळी पर्यटनावर अवलंबून आहेत. मात्र यंदा प्रशासनाच्या पर्यटन बंदीच्या निर्णयामुळे सर्वांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. ( Lonavala Khandala Taxi Association march against tourism ban )

त्यामुळे प्रशासनाने पारित केलेला पर्यटन बंदीचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने राम मंदिर ते भुशी धरण असे पाच किलोमीटर दूर पायी चालत जाऊन मंडळ अधिकारी जाधव यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना कवीश्वर यांनी, पावसाळी पर्यटन काळात बंदी आदेश पारित केल्याने स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे बंदी आदेश मागे नाही घेतला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या ‘मनु भाकर’वर अभिनंदनाचा वर्षाव । Manu Bhaker
– पुणे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती काय, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी

Next Post

कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Famous narrator Anil Dharmadhikari passed away

कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.