व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विद्युत रोहित्रांतील तारांची चोरी करणारी टोळी गजाआड, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई । Vadgaon Maval

टाकवे बुद्रूक, कान्हे फाटा, वडेश्वर आदी ठिकाणी विद्युत रोहित्रांतील तांब्याच्या तारांच्या चोरीचे गुन्हे केलेल्या टोळीला पकडण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 28, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


Dainik Maval News : टाकवे बुद्रूक, कान्हे फाटा, वडेश्वर आदी ठिकाणी विद्युत रोहित्रांतील तांब्याच्या तारांच्या चोरीचे गुन्हे केलेल्या टोळीला पकडण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 78 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व कॉईल असा जवळपास 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

रमेश बाळू पडवळ (वय 27 वर्षे), सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे (वय 29 वर्षे, दोन्ही रा. निमगाव दावडी, ता. खेड, जि. पुणे), रवींद्र सुरेश गावडे (वय 24 वर्षे, रा.खडकी, पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे), सुनील सुरेश गावडे (वय 23 वर्षे, रा. खडकी पिंपळगाव, ता.आंबेगाव, जि. पुणे) व चोरीचा माल विकत घेणारा भंगार दुकानदार बैदुल अब्दुल्ला चौधरी (वय 42 वर्षे, रा. कान्हे मावळ, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ( Gang of stealing wires from electrical appliances arrested by Vadgaon Maval police )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 20 जुले रोजी टाकवे गावच्या हद्दीत अमित विजयकुमार पोखरणा यांच्या जागेमध्ये असलेला 63 केव्हीचा रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची तक्रार वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही रोहित्रांतील तांब्याच्या तारांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे, नागरिक आणि शेतकरी यांच्यात चिंतेचे वातावरण होते.

त्याअनुषंगाने गुन्ह्यातील टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी पोलीस अंमलदारांचे एक पथक तयार केले. त्यात उपनिरीक्षक सुनील जावळे, अजित ननावरे, सचिन गायकवाड, सचिन काळे, शशिकांत खोपडे आदींचा समावेश होता.

सदर तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून रोहित्रांमधील तारा चोरण्याच्या स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी करत असताना त्यांना वरील टोळीची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपींना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यामुळे आरोपींना रितसर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवून तपास केला असता त्यांनी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. तसेच यातील माल भंगार दुकानदार बैदुल अब्दुल्ला चौधरी याला विकल्याचे सांगितले.

अधिक वाचा –
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News
– आता प्रत्येक शाळा, कॉलेजसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्‍ती ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची सुचना
– साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आता संपूर्ण संचालक मंडळावर


Previous Post

पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News

Next Post

जय शिवराय… कामशेत शहरात उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा, ग्रामसभेत ठराव । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj

जय शिवराय... कामशेत शहरात उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा, ग्रामसभेत ठराव । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.