Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 23) रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला ठार करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिनंदन सारा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, प्रमोद कुमार (वय 23) याला पोलिसांनी हत्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन आणि प्रमोद हे दोघेही बिहार राज्यातील आहेत. ते कामाच्या निमित्ताने मागील काही महिन्यांपूर्वी तळेगाव एमआयडीसी परिसरात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन सारा हा नानोली येथील एका कंपनीत काम करत होता. दोघांमध्ये उसनवारीने पैसे देण्यावरून भांडण होते. रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यानंतर प्रमोद कुमार याने अभिनंदन याच्या डोक्यात दगड मारून त्यास ठार मारले.
घटनेची पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी काही वेळेत प्रमोद कुमार याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News
– निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार