व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव येथे संपन्न । Talegaon Dabhade

संचालकांनी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न करावे - संतोष भेगडे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 24, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Taluka Secondary Teachers Credit Union

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संचालकांनी सभासदांच्या हित लक्षात घेऊन संचालकांनी पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व नगरसेवक संतोष भेगडे यांनी मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष भेगडे उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, जेष्ठ सल्लागार भाऊसाहेब आगळमे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे,पतसंस्थेचे अध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष अशोक कराड, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे यांच्यासह संचालक धनकुमार शिंदे, सोपान असवले, सुमन जाधव, दत्ता गायकवाड, विजय वरघडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना भेगडे म्हणाले की, शिक्षकांसाठी अनेक बचत योजना राबवून तसेच जास्तीत जास्त ठेवी घेऊन सभासदांना कर्ज वाटप करावे. यावेळी बोलताना भाऊसाहेब आगळमे, विलास भेगडे व अध्यक्ष भारत काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्या सभासदांनी अविरतपणे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी योगदान देऊन पतसंस्था वाढीसाठी व प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत, ld/e निवृत्त सभासदांचा सन्मान करण्यात आला.

तसेच सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करत यश संपादन केले, त्यांचाही सन्मान करण्यात आला. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष नारायण असवले यांची कन्या आंदर मावळातील पहिली सी.ए वेदांगी असवले हीने मान मिळवला तसेच शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष लक्ष्मण मखर यांची कन्या वैष्णवी मखर ही सी.ए परिक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आणि जेष्ठ सभासद वशिष्ठ गटकुळ यांची कन्या तेजश्री गटकुळ ही जिल्हा परिषद पुणे येथे वित्त विभागात रुजू झाली म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राम कदमबांडे, सुत्रसंचलन सुमन जाधव व वैशाली कोयते यांनी केले तर आभार संचालक सोपान असवले यांनी मानले.
अधिक वाचा –
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News
– निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार


Previous Post

धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime

Next Post

तळेगाव शहरातील विकासकामांची चौकशी करा ; फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव शहरातील विकासकामांची चौकशी करा ; फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.