व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभेत एक लाखाहून अधिक ‘लाडक्या बहिणी’, आमदार सुनिल शेळकेंकडून योजनेचा आढावा । Mazi Ladki Bahin Yojana

मावळ विधानसभेत एक लाखाहून अधिक ‘लाडक्या बहिणी’, आमदार सुनिल शेळकेंकडून योजनेचा आढावा । Mazi Ladki Bahin Yojana

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 28, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
मावळ विधानसभेत एक लाखाहून अधिक ‘लाडक्या बहिणी’, आमदार सुनिल शेळकेंकडून योजनेचा आढावा । Mazi Ladki Bahin Yojana

Dainik Maval News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता-भगिनींना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. विविध ठिकाणी नोंदणी केंद्रे उभारुन योजना प्रभावीपणे मावळ विधानसभेत राबविण्यात आली. त्यामुळेच तालुक्यातुन आतापर्यंत 1 लाख 3 हजार 178 भगिनी योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, अशी माहिती मावळ विधानसभेचे आमदार तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष सुनिल शेळके यांनी दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती व आढावा घेण्यासाठी मावळ तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनिल शेळके होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बाल विकास अधिकारी विशाल कोतागडे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घाडगे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकारी ममता राठोड, तसेच मावळ विधानसभेतील इतर अधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके पुढे म्हणाले, काही भगिनींचे अर्ज अपूर्ण माहिती, अर्धवट कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे पात्र ठरल्या नसतील. तसेच ज्या महिलांची सर्व कागदपत्रे असुनही अर्ज योग्य ठिकाणी भरले नसल्यामुळेच लाभ मिळाला नसेल. त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा अधिकृत केंद्रांवरच अर्ज भरणे आवश्यक होते. मावळातुन जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला याबद्दल समाधानी आहे.

यावेळी आमदारांनी बैठकीत पडताळणी केलेले अर्ज, मंजूर झालेले अर्ज याची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी सेविका व प्रशासन स्तरावरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेच्या लाभापासून आपल्या तालुक्यातील कुठलीही पात्र महिला-भगिनी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेतली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हिंदू राष्ट्र सेना संघटनेची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, धनंजयभाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती । Maval News
– महाराष्ट्रातील 11 गडकिल्ल्यांवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम ; युनेस्कोचे शिष्टमंडळ करणार गडांची पाहणी । Maval News
– पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती


Previous Post

पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाकडून ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा ; कामशेत येथे पथनाट्य सादरीकरण

Next Post

पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Rain Updates

पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.