व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval

या स्पर्धेचा भव्य असा बक्षीस वितरण सोहळा सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात पार पडला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 17, 2024
in लोकल, शहर
Mi Durga Best Selfie and Reels Contest 2024 Vadgaon Maval Prize distribution ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त माजी उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नवरात्रमध्ये खास महिलांसाठी नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करून दररोज एक सेल्फी व रिल्स पाठवणाऱ्या स्पर्धकांसाठी मी दुर्गा बेस्ट सेल्फी अँड रिल्स कॉन्टेस्ट 2024 ही स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेचा भव्य असा बक्षीस वितरण सोहळा सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात पार पडला. सलग नऊ दिवस घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 162 महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये अमृता सांगाडे, अश्विनी पाटील, स्वाती पाटोळे, कामिनी पाटील, प्रतिभा थोरात, सलोनी मोतीबने, ममता दौंडे, पुनम गायकवाड, कविता पाटील या प्रत्येकी नऊ दिवसाच्या नऊ दुर्गा म्हणून विजयी झाल्या. विजय स्पर्धाकांना एक नथ, मिक्सर, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, देऊन सन्मानित करण्यात आले.

याच नवदुर्गांपैकी लकी ड्रॉ पद्धतीने एक भाग्यशाली महादुर्गा – २०२४ चा बहुमान प्रतिभा थोरात यांना मिळाला. त्यांना फ्रिज, क्राऊन, विनर्स फ्लॅश, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. शिवानी कल्हाटकर, रूपाली जाधव, विशाखा लोंढे, यांना बेस्ट रिल्स विजेता म्हणून बहुमान मिळाला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे टी.व्ही, गिझर, मिक्सर, सन्मान चिन्ह मानाचा फेटा, पुष्पगुच्छ प्रमाणपत्र, देऊन गौरविण्यात आले.

नेहा पाटील, किरण ढेरे, सुचिता भामरे, दिपाली मोरे, वनिता होळकर, अंजली पंडित, पुष्पा वाळुंज, सुनीता राठोड,शामल शेटे यांना उत्तेजनार्थ सेल्फी पारितोषिक देण्यात आले. तर अवनी साळुंके,राधिका कादे, कल्याणी गायकवाड, पूजा चौधरी, वैशाली शिंदे, मानसी शेळके, सुनिता तरळकर, वैष्णवी तांबे,पूजा शिंदे, यांना बेस्ट रिल्स उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता यामध्ये मंदा खोल्लम – प्रथम, विमल वाळुंज – द्वितीय, किरण पाल- तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तत्पूर्वी उपस्थित निमंत्रित महिला पाहुण्यांच्या वतीने दीप प्रज्वलन करून, आणि गगन डान्स अकॅडमीचे नृत्य कलाकारांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सारिका सुनील शेळके, उज्वला रवी भेगडे, धनश्री भोंडवे, सुनिता कुडे, पुष्पा सुराणा, अर्चना कुडे, उपस्थित होत्या. तर निमंत्रित पाहुण्या म्हणून काजल ढोरे, हर्षदा दुबे, मालती घारे, अश्विनी बवरे, पूजा वहिले, पूजा पिंगळे, ज्योती कदम, श्रेया भंडारी, माधवी बोरावके, सीमा ढोरे, मंदाकिनी वाघमारे या उपस्थित होत्या.

कृष्णकला मंच चिंचवड यांचे वतीने मनमोहक असे गरबा नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका पूजा थिगळे यांनी केले. तर नियोजन – अश्विनी म्हाळसकर, सुषमा म्हाळसकर, जागृती म्हाळसकर, प्रणाली म्हाळसकर, साक्षी म्हाळसकर, प्रतिक्षा शिंदे यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही

Next Post

अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shivdurg Rescue Team Missing Youth Search Operation At Rajmachi Garden Khandala

अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला 'त्याचा' शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.