व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…

यंदाच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आमदार सुनिल शेळके हे पक्षाचे स्टार प्रचारक राहिले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 21, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
sunil-shelke-ajit-pawar-latest

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर करीत आहे. मंगळवार, अर्थात 22 जून पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असल्याने प्रत्येक इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत. रविवारी (दि. 20) भाजपाने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची सोबत महाविकासआघाडीची पहिली यादी केव्हा जाहीर, होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात सोमवारी अजित पवार यांनी उमेदवारी यादी जाहीर न करता १७ उमेदवारांना थेट AB Form (एबी फॉर्म) वाटून टाकले. त्यामुळे अजित दादांचा पॅटर्न कुणाच्याही लक्षात येत नाहीये. त्यात आता अजित पवारांकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर होण्याची प्रतिक्षा असताना सोमवारी अजितदादांनी मात्र वेगळीच यादी जाहीर केली आहे.

अजित पवार यांनी सोमवारी (दि.21) आपल्या पक्षाच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 27 जणांची नावे आहेत. परंतु महत्वाची बाब म्हणजे पक्षाचा लोकप्रिय चेहरा असलेले मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे नाव मात्र या यादीतून वगळण्यात आलेले आहे. तसे पाहता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आमदार सुनिल शेळके हे पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यामुळे विधानसभेतही ते पक्षाचे स्टार प्रचारक असू शकतील अशी शक्यता होती. मात्र त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण झाले आहे.

महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार,
राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..!

विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत… pic.twitter.com/0ph5JqMhDG

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 21, 2024


आमदार शेळकेंना अद्याप एबी फॉर्म नाही…
भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मावळ विधानसभेचे नाव नाही. सोबत सोमवारी अजित पवार यांनी एबी फॉर्म वाटताना सुनिल शेळके यांना एबी फॉर्म दिलेला नाही. ( ही बातमी लिहित असे पर्यंत तरी एबी फॉर्म दिलेला नाही) त्यामुळे मावळ हा महायुतीत कळीचा मुद्दा असलेला मतदारसंघ असल्याचे सिद्ध झाले आहे. सोबत अजित पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर प्रचाराची धूरा न सोपविण्याचेही अनेक अर्थ निघतात.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा
– राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत सुनिल शेळकेंचे नाव असणार, ‘या’ 6 कारणांमुळे अजितदादा शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार


dainik maval jahirat

Previous Post

फरार आरोपींबाबत वडगाव न्यायालयाचा आदेश जारी । Vadgaon Maval

Next Post

भाजपाने दिलेली ‘ती’ जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ravindra Bhegde

भाजपाने दिलेली 'ती' जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.