व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 22, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Suhas Divse

Photo Courtesy : FB / DIO Pune


Dainik Maval News : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतील २१०, बारामती तालुका १४९, माळेगाव १४७, वडगांव निंबाळकर १४७, सुपा २९, वालचंदनगर २३५, इंदापूर २४४, भिगवण ७४, दौंड १३०, यवत हद्दीतील २८८, उरुळी कांचन ११७, शिरुर २७३, रांजणगाव ५०, शिक्रापूर ११९,सासवड ११४, जेजुरी ९२, भोर ११२, राजगड १०६, हवेली ६७, वेल्हा हद्दीतील १७९, पौड पोलीस ठाणे हद्दीतील २७८, लोणावळा ग्रामीण ३५, लोणावळा शहर ६७, वडगांव मावळ ३७, कामशेत ४६, खेड ९२, मंचर पोलीस ठाणे हद्दीतील ४८, पारगांव पोलीस ठाणे हद्दीतील ३०, घोडेगाव २९, जुन्नर ४१, नारायणगाव ३९, आळेफाटा ३०, ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील २३ शस्त्र परवान्यांच्या समावेश आहे.

गठीत करणेत आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांचेकडे असलेल्या शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच गावातील विशिष्ट समाजातील प्रभावशाली व्यक्ती, ज्या निवडणुकीचे प्रक्रियेमध्ये ऐनकेनप्रकारे संमिलीत होण्याची शक्यता आहे अशा व्यक्ती राजकीय पक्षाचे प्रचारात अथवा राजकीय सभेमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या व्यक्ती प्रचारात अथवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाल्यास ते शस्त्रपरवानाधारक असल्याने या बाबींचा गावात, त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणात अथवा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पडू शकत असलेने, अशा परवानाधारकांची तसेच मयत परवानाधारकांची शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश शस्त्र परवाना धारकांना पोलीस विभागाने तात्काळ बजवावेत. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता मधील कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांसोबत प्रशासनाची बैठक
– भाजपाने दिलेली ‘ती’ जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…


Previous Post

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघामुळे महायुतीत ताणाताण ! अजितदादांवर मावळचा ‘त्याग’ करण्यासाठी दबाब ? । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Assembly Constituency Ajit Pawar mla Sunil Shelke Will give seat to BJP?

मावळ विधानसभा मतदारसंघामुळे महायुतीत ताणाताण ! अजितदादांवर मावळचा 'त्याग' करण्यासाठी दबाब ? । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.