व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात महायुतीतील वाद विकोपाला ! ‘शेळकेंच्या’ उमेदवारीला ‘भेगडेंचा’ तीव्र विरोध, मविआला होणार फायदा ? Maval Vidhan Sabha

मावळ तालुक्यात महायुतीतील अंतर्गत वाद तीव्र विकोपाला गेल्याचे दिसत आहे. उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच शेळके विरुद्ध भेगडे असे वातावरण तालुक्यात तयार होताना दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 23, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval Vidhansabha Sunil Shelke Bala Bhegade Bapu Bhegade Ravindra Bhegade from Mahayuti

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात महायुतीतील अंतर्गत वाद तीव्र विकोपाला गेल्याचे दिसत आहे. उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच शेळके विरुद्ध भेगडे असे वातावरण तालुक्यात तयार होताना दिसत आहे. बाळा भेगडे, रविंद्र भेगडे आणि बापूसाहेब भेगडे हे तालुक्यातील दिग्गज नेते आमदार सुनिल शेळके यांच्या दुसऱ्यांदा उमेदवारीच्या विरोधात जवळ येताना दिसत आहेत. अशात महायुतीची ताकद कमजोर होऊन त्याचा फायदा आयता महाविकासआघाडीला होईल, अशीही चर्चा सध्या तालुक्यात होत आहे.

एकतर मावळची जागा कुणाला द्यायची, यावरुन महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात ताणाताणी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील महायुतीचे जागावाटप बऱ्यापैकी पूर्ण झाले असून मावळवरुन मात्र तिढा निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अशात स्थानिक पातळीवर देखील महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्येही जोरदार घमासान सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातही आमदार सुनिल शेळके यांना विरोध करत असताना बापू भेगडे, रविंद्र भेगडे आणि बाळाभाऊ भेगडे यांच्यात एकी होत असल्याचे तालुक्यात चर्चेत आहे.

परिस्थिती अशीच राहिली, तर याचा अर्थ 2019 प्रमाणे मावळात पुन्हा भेगडे विरुद्ध शेळके अशीच लढत होइल, अशी चिन्हे दिसतायेत. मात्र जागावाटपाचा वाद नसून त्याचा निर्णय लवकरच जाहीर होइल, असेही महायुतीचे पदाधिकारी सांगत आहेत. असे सांगता समोरच्याच्या उमेदवारीला विरोध करण्याचा आणि आपल्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटण्यात मात्र कोणतीही कसर होत नाहीये. एकूण जागेचा हा वाद वरच्या पातळीवर जसा मिटला नाही, तसाच स्थानिक पातळीवर देखील वातावरण तापताना दिसत आहे.

मावळ मतदारसंघ हा तसा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2019 मध्ये उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणूक लढले आणि मोठ्या फरकाने ते जिंकले. तेव्हापासून आमदार शेळके आणि भाजपमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीसोबत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकत्र आले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीसाठी मावळ भाजपने आमदार शेळके यांना कडाडून विरोध सुरू केला. आमदारांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला, गळचेपी केल्याचा आरोप करत शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावच भाजपने यापूर्वीच मंजूर केला आहे.

महायुतीत ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’ असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच मित्रपक्ष भाजपसह स्वपक्षातून आव्हान निर्माण झाले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशाेधन परिषदेचे उपाध्यक्षपद नाकारले आहे. ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

बाळा भेगडेंनी घेतली फडणवीसांचती भेट –
अशा परिस्थितीत भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार बाळा भेगडे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षाच्या भूमिकेनुसार काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मावळात भाजपची ताकद आहे. पक्ष आणि राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी शक्य ते केले जाईल. जागा वाटपानंतर चित्र स्पष्ट होईल. मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांसोबत प्रशासनाची बैठक
– भाजपाने दिलेली ‘ती’ जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघामुळे महायुतीत ताणाताण ! अजितदादांवर मावळचा ‘त्याग’ करण्यासाठी दबाब ? । Maval Vidhan Sabha

Next Post

कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा चोपडे यांची निवड । Kanhe News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gram-Panchayat

कान्हे - नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा चोपडे यांची निवड । Kanhe News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.