व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवारांकडून अर्ज दाखल ; शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी भरला अर्ज

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही मंगळवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 29, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Maval Assembly Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही मंगळवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानुसार निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 6 दिवसांच्या कालावधीत मावळ विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर नामनिर्देशन पत्र दाखल संख्या ही एकूण 26 इतकी आहे.

एकूण 70 नामनिर्देशन फॉर्मची विक्री –
निवडणूक कार्यालयाकडून दिनांक 22 ऑक्टोबरला एकूण 6 उमेदवारांनी 15 अर्ज नेले, 23 ऑक्टोबर रोजी 7 उमेदवारांनी 12 अर्ज नेले, 24 ऑक्टोबरला 3 उमेदवारांनी 6 अर्ज नेले, 25 ऑक्टोबरला 3 उमेदवारांनी 8 अर्ज नेले, 28 ऑक्टोबरला 15 उमेदवारांनी 21 अर्ज नेले आणि 29 ऑक्टोबरला 8 उमेदवारांनी 8 अर्ज नेले. एकूण 42 उमेदवारांना 70 नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली.

एकूण 18 उमेदवारांकडून अर्ज दाखल –
निवडणूक कार्यालयात दिनांक 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नाही. दिनांक 24 ऑक्टोबर रोजी 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. दिनांक 25 ऑक्टोबर रोजी 1 उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला. दिनांक 28 ऑक्टोबरला 1 उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आणि शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. एकूण 6 दिवसात 18 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर 18 उमेदवारांकडून एकूण 26 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

कोणत्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज?
मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनिल शंकरराव शेळके यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.24) दाखल केला. सुनिल शेळके हे मावळ विधानसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर अपक्षामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर बापू जयवंतराव भेगडे यांनी सोमवारी (दि.28) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत गोपाळ तंतरपाळे, रविंद्र भेगडे, सारिका शेळके, मुकेश आगरवाल, रुपाली बोचकेरी, बाळासाहेब नेवाळे, अमृता आपटे, सुरेश्वरी ढोरे, बीडन तरफदार, दादासाहेब यादव आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई – बाबा मतदान करा… मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन
– देवेंद्र फडणवीसांचा आदेश डावलला, बाळा भेगडे यांचा बापू भेगडेंना पाठींबा कायम, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही !
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरिक्षक गार्गी जैन यांनी घेतला मतदान केंद्रांचा आढावा । Maval Vidhan Sabha

Next Post

नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Tehsil Office New Administrative Building Vadgaon Maval MLA Sunil Shelke

नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.