व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

पानटपरीमध्ये झालेल्या चोरीचा संशय तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 30, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : पानटपरीमध्ये झालेल्या चोरीचा संशय तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 27 ऑक्टोबर) सायंकाळी सात ते सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर) सकाळी दहा या दरम्यान मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावात घडली आहे.

अक्षय नरेंद्र सोरटे (वय 28, रा. दारुंब्रे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील नरेंद्र किसन सोरटे (वय 52, रा. दारुंब्रे) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संग्राम उर्फ नामदेव मारुती सोरटे (वय 32) आणि नवनाथ वाघोले (वय 34, दोघे रा. दारुंब्रे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव सोरटे याची पानटपरी आहे. तर, आरोपी वाघोले हा त्याच्याकडे कामाला आहे. एक महिन्यापूर्वी आरोपीच्या पानटपरीमध्ये चोरी झाली होती. मयत अक्षय याने ही चोरी केली असावी, असा संशय आरोपींचा होता. त्यातच आरोपी वाघोले याच्या आई आणि बहिणीला काहीतरी बोलल्याच्या कारणावरून वाघोले आणि मयत अक्षय याची भांडणे झाली होती.

या रागातून दोन्ही आरोपींनी मयत अक्षय याला दारू पिण्यासाठी आरोपी सोरटे याच्या सुरू असलेल्या बंधकामाजवळ नेले. तेथे अक्षयला जबर मारहाण करत त्याचा खून केला. तसेच अक्षयचा मृतदेह बाजूला पडीक असलेल्या शेतात नेऊन टाकला. शिरगाव पोलिस तपास करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरिक्षक गार्गी जैन यांनी घेतला मतदान केंद्रांचा आढावा । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यात पारंपारिक भात कापणीला यंत्राची जोड ; पवनमावळात यंत्राच्या साहाय्याने भात कापणी सुरू
– तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाकडून गावठी पिस्टल जप्त । Maval Crime


Previous Post

नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध, 6 उमेदवारांचे अर्ज बाद ; पाहा बारा उमेदवारांची नावे आणि पक्ष

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Election Sunil Shelke

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध, 6 उमेदवारांचे अर्ज बाद ; पाहा बारा उमेदवारांची नावे आणि पक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांनी संयुक्तरित्या लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.