व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील ‘त्या’ तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार सुनिल शेळके यांचे आरोप फेटाळले ; म्हणाले, आम्ही…

आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (दि.३) वडगाव मावळ येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Press conference of Baburao Waikar Subhash Jadhav Rupesh Mhalsakar at Vadgaon Against Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तालुक्यातील सर्व पुढारी तुमच्या विरोधात का गेले? हे तुम्हीच शोधा. आम्ही कुठले ठेकेदार नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद मिळवून देण्यासाठी माजी राज्यमंत्री मदन बाफना साहेब, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे यांनी अजितदादा पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. माझ्या कामाची पावती म्हणून अजित दादांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला सभापतीपद मिळाले. यामध्ये आमदार सुनील शेळके यांचा काहीही संबंध नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, माजी नगरसेवक दिनेश ढोरे उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (दि.३) वडगाव मावळ येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबुराव वायकर बोलत होते. प्रत्युत्तर देताना वायकर म्हणाले, बापूसाहेब भेगडे यांना सर्व पक्षांनी दिलेला पाठिंबा आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी पाहून आमदार शेळके हे माझ्यासह सुभाष जाधव व रुपेश म्हाळसकर यांच्यावर खोटारडे व बिनविरोधाचे आरोप करत आहेत.

सुभाष जाधव म्हणाले, देवस्थान संस्थानवरती असलेले विश्वस्त आणि त्यांना मिळालेली पदे ही अंतर्गत बाब आहे. याच्याशी आमदार सुनील शेळके यांचा काहीही संबंध नाही. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक म्हणून मी कामकाज करीत आहे. माझ्यातील असलेली गुणवत्ता पाहून हे पद मला मिळाले आहे. आमदार शेळके यांचा याच्याशी काहीही संबंध नाही.

रुपेश म्हाळसकर म्हणाले, मनसेला वैचारिक बैठक आणि दिशा आहे. राजसाहेब यांचा आदर्श ठेवून काम करतो आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मनसेच्या माध्यमातून मी स्वतः आणि सायली म्हाळसकर यांनी समाजाभिमुख अनेक उपक्रम राबविले. समाजकारण करताना राजकारण कधीच केले नाही. कामाची पावती म्हणून सायली रुपेश म्हाळसकर यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली.यामध्ये आमदार सुनील शेळके यांचा काहीही संबंध नाही.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे यांच्या सदिच्छा भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade
– निवडून आल्यास कुणाला पाठींबा देणार? बापूसाहेब भेगडे यांना समर्थन देणाऱ्या महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये संभ्रम
– आमदार सुनिल शेळके यांच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजयासाठी महायुतीचा नियोजनबद्ध प्रचारावर भर । Sunil Shelke


Previous Post

बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा झंझावात ! नागरिकांकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत । Maval News

Next Post

कागदपत्रे दाखवून पंधरा दिवसांच्या आत बेवारस वाहने घेवून जाण्याच्या तळेगाव पोलिसांच्या सूचना । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Abandoned vehicles

कागदपत्रे दाखवून पंधरा दिवसांच्या आत बेवारस वाहने घेवून जाण्याच्या तळेगाव पोलिसांच्या सूचना । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.