व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर, शेवती वसाहत, कडधे, ओझर्डे, राऊतवाडी, बौर येथे सुनील शेळके यांचा जनसंवाद दौरा । Maval News

गावच्या विकासासाठी सुनीलअण्णांना पुन्हा निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 7, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Public communication Visit of mla Sunil Shelke to Pavananagar Kadhe Ozarde Baur village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आपण नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या भूमिकेतूनच काम करतो. आपण कधीच फक्त भावकीचा विचार केला नाही. आपण गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला, असे मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सांगितले.

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके पवनानगर, शेवती वसाहत, कडधे, ओझर्डे, राऊतवाडी, बौर या गावांचा जनसंवाद दौरा केला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्ष दीपाली गराडे तसेच ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठल शिंदे,पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, आदी पदाधिकारी होते.

पवन मावळात ठिकठिकाणी आमदार शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा व डीजेच्या दणदणाटात रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची उधळण आणि औक्षण करीत सर्व ग्रामस्थांनी शेळके यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

ओझर्डे गावात सव्वादोन कोटींची विकास कामे
ओझर्डे गावाला आमदार शेळके यांनी सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी दिल्याचे धनंजय ओझरकर यांनी सांगितले. या व्यतिरिक्त खडी आणि दोन लाख रुपयांची वैयक्तिक मदत केली. सुनीलअण्णांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाली, असे ते म्हणाले.ओझर्डे गावात संदीप शेळके, भरत भोपे, विष्णू मुऱ्हे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

मावळच्या विकासाचे मॉडेल जगासाठी पथदर्शक
बौर गावात बाळू मोहोळ म्हणाले की,”मावळच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण जगासाठी पथदर्शक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आमदारांच्या मागे आहे. त्यामुळे ते नक्कीच बहुमताने निवडून येतील हा विश्वास आहे. त्यासाठी सर्वांनी एक नंबरचे बटन दाबून त्यांना निवडून आणावे.“

संदीप खिरिड म्हणले की,”बौर गावाला मोठा विकास निधी दिल्याबद्दल मी आमदारांचे आभार मानतो, बौर गावातील तरुणांना न्याय फक्त तुम्हीच देऊ शकता, हीच आशा आहे म्हणून तुम्हाला आमचा पाठिंबा आहे”

राऊतवाडीत १० कोटींचा विकास निधी
राऊतवाडीतही आमदार शेळके यांचे जोरदार स्वागत झाले. त्यावेळी माजी सरपंच पोपटराव राऊत तसेच नामदेव राऊत, काळुराम राऊत, सोपान करके, भगवान लगड, शंकर लगड, आदेश लगड आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. गावातील विकासकामांसाठी आमदारांनी १० कोटी रुपयांचा निधी दिला. २० लाख रुपये देऊन गावातील मंदिराचे काम पूर्ण केले. आमदारांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत केली आहे,” असे आदेश लगड म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे वडगाव मावळची बाजारपेठ झाली सुसज्ज ! Vadgaon Maval
– पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade
– पवनानगर येथील विजयी संकल्प मेळाव्यात सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ; नागरिकांची तोबा गर्दी 


dainik maval jahirat

Previous Post

मावळात महायुतीत बिघाडी कायम, सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार । Maval Vidhan Sabha

Next Post

जनतेचा आशीर्वाद हीच माझी काम करण्याची ताकद – आमदार सुनिल शेळके । Mla Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Mahayuti candidate Sunil Shelke Visit at Urse Adhe Village

जनतेचा आशीर्वाद हीच माझी काम करण्याची ताकद - आमदार सुनिल शेळके । Mla Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.