व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार ; विरोधी उमेदवारावर आरोपांच्या फैरी । Bapu Bhegade

मावळ विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा प्रचारदौरा सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 8, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
campaign tour of Bapusaheb Bhegde in Maval Assembly Constituency is going on

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळचे आमदार आज मावळ तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात विकासाच्या नावाखाली तालुक्यातील नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे. एवढा मोठा निधी कुठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे, असा सवाल उपस्थित करीत बापूसाहेब भेगडे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मावळ तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे.

मावळ विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा प्रचारदौरा सुरू आहे. वेहरगाव येथे एकविरा देवी पायथा मंदिर येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. वेहरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटने, टाकवे खुर्द, मुंढावरे (फांगणे वसाहत), मुंढावरे, पाथर, ताजे, पिंपळोली, बोरज आदी ठिकाणी महिलांनी औक्षण करीत बापूसाहेब भेगडे यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या मावळ अध्यक्ष सायलीताई बोत्रे, भाजप नेते जितेंद्र बोत्रे, भाजपचे मावळ अध्यक्ष दत्तात्रेय गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद कुटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदींसह ग्रामस्थ आजी-माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

वेहरगाव येथील नागरिकांनी चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार यावेळी महिलांनी केली. ज्या पाण्यात म्हशी बसतात, ते पाणी आम्हाला पिण्यासाठी वापरावे लागते. फांगणे वसाहत येथील नागरिकांनी सांगितले, पाच वर्षांपूर्वी आमदारांनी पाण्याच्या टाकीचे काम सुरू केले. मात्र, अद्याप टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. बापूसाहेब भेगडे आमदार झाल्यावर या टाकीचे काम निश्चित पूर्ण करतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

मावळमधील रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी व मावळचा स्मार्ट विकास करण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास नागरिकांनी यावेळी दिला.

गेल्या ५ वर्षात विकासकांना ब्रेक लावणाऱ्यांना, मावळची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्या, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये इंटरेस्ट दाखवून त्यांचे महत्त्व कमी करणाऱ्या, तसेच व्यापारी वर्ग व तरुणांना दिशाहीन करणाऱ्या, ट्रस्ट व गावांनाही विचारात न घेता कारभार हाकणाऱ्या आमदार शेळकेंना घरी बसवा. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’
– आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke
– बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade


Previous Post

कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या सुनीलअण्णांच्या पाठीशी कष्टकरी समाज उभा राहणार – बाबा कांबळे

Next Post

त्यांच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मावळात भाजपा पक्ष संपत चाललाय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval assembly candidate Sunil Shelke criticizes BJP leaders

त्यांच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मावळात भाजपा पक्ष संपत चाललाय - आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.