व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वातावरण तापलं ! मावळात शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात

राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापलेलं दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 10, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval Assembly Constituency Controversy between workers of candidate Sunil Shelke and Bapu Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापलेलं दिसत आहे. महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात सरळ लढत होत असलेल्या मावळ विधानसभेत सध्या दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान शनिवारी (दि.9) लोणावळा येथे प्रचार रॅली दरम्यान शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

शनिवारी (दि. 9 नोव्हेंबर) महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांची लोणावळा शहरात पूर्वनियोजित प्रचार रॅली होती. तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यासाठी बाळा भेगडे, रविंद्र भेगडे आदी नेत्यांनी प्रचार रॅलींचे आयोजन केले होते. यादरम्याव भांगरवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास उमेदवार सुनिल शेळके आणि बापू भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

भांगरवाडीतील राम मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर जात असलेल्या उमेदवार सुनिल शेळके यांच्याबाबत बापू भेगडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांपैकी कुणीतरी घोषणा दिली. त्यानंतर शेळके यांच्या बाजूनेही प्रत्युत्तर आले. त्यातून नंतर ही घोषणाबाजी आणि बाचाबाची वाढत गेली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिळविला आणि दोन्ही रॅलीचे मार्ग सुकर केल्याने कुठलाही अनुचित प्रचार घडला नाही.

परंतु या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे मावळ विधानसभेची निवडणूक किती अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. ते समजून येते. दरम्यान उमेदवार सुनील शेळके यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले असून विरोधक जाणूनबुझून असे प्रकार करीत आहेत, असे म्हटले आहे. विरोधी पक्षातून बाळा भेगडे यांनी उमेदवार शेळके यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचे म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभेतील उमेदवारांना खर्च निरिक्षकांच्या नोटीसा ; खर्चाचे अपूर्ण सादरीकरण केल्याने नोटीस । Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बसचा अपघात ; बसमधील २६ प्रवासी जखमी
– शिरगावातील श्री साई मंदिर परिसरात मतदार जनजागृती अभियान, मावळ पंचायत समितीचा उपक्रम । Maval Vidhan Sabha


Previous Post

कार्ला, कुसगाव, ओळकाईवाडी येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन । Lonavala Police

Next Post

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला – आमदार सुनील शेळके । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
case registered against maval MLA Sunil Shelke for holding campaign rally after 10 pm

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला - आमदार सुनील शेळके । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.