Dainik Maval News : देहूरोड ऑर्डनन्स डेपोला यावर्षीचा देशातील सर्वोत्कृष्ट ऑर्डनन्स डेपो म्हणून बहुमान मिळाला आहे. दिल्ली येथील आर्मी मुख्यालयात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भारतीय सेना आयुध कोर प्रमुख लेफ्टनंट जनरल सुरेश चंद्रा तांडी यांच्या हस्ते देहूरोड ऑर्डनन्स डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मनोज कुमार शर्मा हे पुरस्कार घेऊन देहूरोड ऑर्डनन्स डेपो येथे आल्यानंतर डेपोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कमांडट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा म्हणाले, आजच्या पुरस्काराचे खरे मानकरी डेपोतील सर्व कामगार आहेत. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ पुरस्काराच्या रूपाने मिळाले आहे. असेच कार्य करत रहा आणि डेपोचा आयुध कोरचा मान वाढवत जा. भारतीय सेनेत सर्वात महत्वपूर्ण डेपो म्हणून केंद्रीय आयुध भण्डार देहूरोडला मान मिळाला आहे, तो मान कधीच कमी होणार नाही, यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष